जिथे कंपन आहे, तिथे ध्वनी असणारच. म्हणून योगात आम्ही म्हणतो, संपूर्ण अस्तित्व हे केवळ ध्वनी आहे. आम्ही याला नाद ब्रह्म म्हणतो, ज्याचा अर्थ सृष्टी आणि सृष्टिकर्ता हे केवळ ध्वनी आहेत.
सद्गुरू : खूप पूर्वीपासून, जेव्हा लोक भारत हा शब्द उच्चारायचे, तेव्हा ते नेहमी त्याकडे एक संभावना म्हणून पाहायचे. कारण भारत हा या जगातला सर्वात मोठा प्रयोग आहे - संपूर्ण संस्कृतीला आणि राष्ट्राला एक आध्यात्मिक प्रक्रिया बनवण्याचा प्रयोग. या भूमीत जन्माल्यानंतर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता - करिअर करू शकता, कुटुंब वाढवू शकता आणि आयुष्याचे इतर पैलू जगू शकता, पण मुळात तुमचे जीवन हे सर्वोच्च मुक्तीसाठी आहे. मुक्ती हेच एकमेव ध्येय आहे. या संस्कृतीची रचनाच अशी केली गेली. तुम्ही करत असलेली प्रत्येक कृती ही तुमची चेतना उंचावण्यासाठीच होती.
म्हणून या संस्कृतीत संगीत, नृत्य किंवा तुम्ही करत असलेली इतर कोणतीही गोष्ट ही केवळ मनोरंजन नव्हती, ती एक आध्यात्मिक प्रक्रिया होती. शास्त्रीय संगीतात, ध्वनीचा वापर - राग, स्वर, सर्व काही - असे आहेत, की जर तुम्ही त्यात खोलवर गुंतलात, तर ते तुम्हाला ध्यानावस्थेत नेईल. नृत्य हे केवळ मनोरंजन नाही. जर तुम्ही मुद्रा आणि स्थिती योग्य प्रकारे वापरल्या, तर त्या तुम्हाला ध्यानावस्थेत नेतील. जर तुम्ही शास्त्रीय संगीतात खोलवर रुजलेल्या व्यक्तीला पाहिले, तर तो संतासारखा वाटेल. संगीत हे केवळ मनोरंजनासाठी कुणीतरी बनवलेले 'धांगडधिंगा' नव्हते. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मनोरंजन हा नव्हता. प्रत्येक गोष्ट ही उच्च चेतना प्राप्त करण्यासाठीची साधना होती. प्रत्येक गोष्ट, बसणे, उभे राहणे, जेवण करणे हे सुद्धा साधनाच होते.
जर तुमच्याकडे श्रवणासाठी कान असतील, तर संपूर्ण अस्तित्व हे केवळ संगीतच आहे. तुमचे शरीर संगीत आहे, प्रत्येक गोष्ट संगीत आहे, कारण संपूर्ण अस्तित्व हे केवळ एक प्रतिध्वनी आहे. जिथे कंपन आहे, तिथे ध्वनी असणारच. म्हणून संपूर्ण अस्तित्व हे ध्वनींचे एक जटिल मिश्रण आहे. हे ध्वनी, जर तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने ऐकले, तर ते भयानक गोंधळ वाटतात. दुसऱ्या पद्धतीने ऐकले, तर भव्य संगीत वाटते. म्हणून जो योग्य पद्धतीने ऐकतो, त्याच्यासाठी सर्व काही संगीतच आहे. जो ध्वनीची संपूर्णता जाणत नाही, त्याच्यासाठी तो केवळ गोंधळ आहे, कारण तो तुकड्या-तुकड्यांमध्ये ऐकतो. जो अस्तित्वाची संपूर्णता ऐकतो, त्याच्यासाठी सर्व काही संगीतच आहे; असे काहीच नाही, जे संगीत नाही. शरीर सुद्धा अद्भुत संगीताने स्पंदित होत असते, जर तुम्ही ऐकले तर.
आता ध्वनी म्हणजे काय? जर तुम्ही कोणताही ध्वनी ऑसिलोस्कोपमध्ये - एक ध्वनी मापन उपकरण - प्रसारित केला, तर त्याच्या फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारतेनुसार आणि प्रमाणानुसार एक आकार तयार होतो. याचा अर्थ प्रत्येक ध्वनीला एक आकार जोडलेला असतो. त्याचप्रमाणे, प्रत्येक आकाराला एक ध्वनी जोडलेला असतो किंवा दुसऱ्या शब्दांत, आजचे आधुनिक विज्ञान तुम्हाला हे सिद्ध करून दाखवत आहे, की संपूर्ण अस्तित्व हे केवळ ऊर्जेचे कंपन आहे. साधारण साठ-सत्तर वर्षांपूर्वी, आधुनिक विज्ञान हे भौतिक-पदार्थावर विश्वास ठेवायचे, पण आता तसे नाही. जेव्हा वैज्ञानिक पुनर्जागरण सुरू झाले, तेव्हा वैज्ञानिकांना वाटायला लागले, की जर तुम्हाला पदार्थावर प्रभुत्व मिळवता आले, तर तुम्ही काहीही करू शकता. फ्रेडरिक नीत्शेसारख्या लोकांनी घोषित केले, की आपल्याला पदार्थावर प्रभुत्व प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे आणि आपण काहीही करू शकतो. जर इच्छा केली, तर आपण स्वतःच सृष्टी निर्माण करू शकतो, आणि त्याने घोषित केले, की देव मेला आहे. हे त्याचे प्रसिद्ध विधान होते. पण आज, विज्ञानाने एक संपूर्ण वर्तुळ पूर्ण केले आहे आणि आता विज्ञान स्वतःच भौतिक-पदार्थाला नाकारत आहे. विज्ञान म्हणते, की भौतिक-पदार्थ अशी काही गोष्टच नाही - ती केवळ एक भासमान गोष्ट आहे. वास्तविकता ही आहे, की संपूर्ण अस्तित्व हे केवळ एक कंपन आहे.
जिथे कंपन आहे, तिथे ध्वनी असणारच. म्हणून योगात आम्ही म्हणतो, संपूर्ण अस्तित्व हे केवळ ध्वनी आहे. आम्ही याला नाद ब्रह्म म्हणतो, ज्याचा अर्थ सृष्टी आणि सृष्टिकर्ता हे केवळ ध्वनी आहेत.
"जर सर्व काही ध्वनी आहे, तर मला का ऐकू येत नाही?" हा प्रश्न स्वाभाविकपणे तयार होईल. तुम्हाला ते केवळ यासाठी ऐकू येत नाही, कारण तुमची ऐकण्याची क्षमता ही केवळ फ्रिक्वेन्सीच्या एका लहान पट्ट्यापुरती मर्यादित आहे. तुम्ही त्याच्या खालचे सबसॉनिक किंवा आवाजाच्या वेगापेक्षा कमी असलेले, त्याच्या वरचे अल्ट्रासॉनिक किंवा आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असलेले म्हणता. तुम्ही जे ऐकता, श्राव्य किंवा सॉनिक, हा फ्रिक्वेन्सीचा एक लहान पट्टा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही रेडिओ ट्यून केला, तर अचानक तो गाऊ लागतो किंवा बोलू लागतो. हे कुठून येते? ते एका फ्रिक्वेन्सी मोडमध्ये आहे, जे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या बाहेर आहे, पण ते सगळीकडे आहे. त्याचप्रमाणे, संपूर्ण अस्तित्व हे केवळ ध्वनी आहे, पण ते तुमच्या अनुभवात येत नाही, कारण तुमची ऐकण्याची क्षमता मर्यादित आहे.
जर तुम्ही काही विशिष्ट अवस्थांमध्ये गेलात, ज्याला आम्ही ऋतंभरा प्रज्ञा म्हणतो, मग जर तुम्ही कोणताही आकार पाहिला, तर त्याला जोडलेला ध्वनी तुम्हाला स्पष्ट होतो. अशा अवस्थेत, संपूर्ण अस्तित्व हे केवळ ध्वनी असते. सात मूलभूत संगीत स्वर यातूनच आले आहेत. मानवी शरीराची रचना सात मूलभूत घटकांसह रचली गेली आहे आणि या सात मूलभूत घटकांचे मूळ ध्वनी, हेच जगभरात संगीत स्वर बनले आहेत. जर तुम्ही संगीताबाबत काही प्रयोग केला, तर सर्व काही या सात स्वरांच्या मर्यादेत येते, कारण शरीराची मूळ रचनाच सृष्टीच्या सात आयामांमध्ये आहे, जे चक्रांच्या रूपात दर्शवले जातात. ही चक्रे केवळ ऊर्जा प्रणालीची एका विशिष्ट पद्धतीने भेटण्याची ठिकाणे आहेत. जर एखादा स्वतःमध्ये पूर्णपणे स्तब्ध झाला, तर शरीराचा अनुभव ध्वनी म्हणून घेता येतो. या अवस्थेतच हे सात स्वर विकसित झाले आहेत.
- सद् गुरू
(ईशा फाऊंडेशन)