अंशुमन, नीझा यांना अनुक्रमे पुरुष, महिला एकेरीचे विजेतेपद

बीपीएस टेबल टेनिस स्पर्धा : इशिता कोलासो हिला विजेतेपदाचा दुहेरी मुकूट

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
अंशुमन, नीझा यांना अनुक्रमे पुरुष, महिला एकेरीचे विजेतेपद

बीपीएस ऑल गोवा मेजर रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.  

पणजी : फातोर्डा येथील मल्टिपर्पज स्टेडियमवर पार पडलेल्या बीपीएस ऑल गोवा मेजर रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत अंशुमान अग्रवाल आणि नीझा कामत यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. बीपीएस स्पोर्ट्स क्लब आणि गोवा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही आठवडाभर चाललेली स्पर्धा झाली.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अंशुमान अग्रवालने अव्वल मानांकित आरोन फरियासवर दोन गेम गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत ४-२ असा विजय मिळवला. महिला एकेरीत नीझा कामतने उत्कंठापूर्ण सामन्यात उर्वी सुरळकरला ३-२ अशा फरकाने हरवले.
इशिता कोलासो हिने शानदार कामगिरी करत मुलींच्या १५ वर्षांखालील व १९ वर्षांखालील गटातील एकेरी विजेतेपद जिंकले. विशेष म्हणजे तिने एकही गेम न गमावता हे दोन्ही विजेतेपद पटकावले.
११ वर्षांखालील मुलींच्या गटात अनया शुक्लाने शौर्या देसाईवर ३-२ ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात इशान कोलासोने अशांक दळवीवर ३-० ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
१३ वर्षांखाली मुलींच्या गटात आयुषी आमोणकरने आर्ना लोटलीकरवर ३-२ ने विजय मिळवून विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात रुहान शेखने युग प्रभूवर ३-२ ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
१५ वर्षांखालील मुलींच्या गटात इशिता कोलासोने आर्ना लोटलीकरवर ३-० ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात चंदन कारो – युग प्रभूवर ३-० ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात इशिता कोलासोने अनुश्री नाईकवर ३-० ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात आरोन फरियासने चंदन कारोवर ३-२ ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
महिला एकेरी गटात नीझा कामतने उर्वी सुरळकरवर ३-२ ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. पुरुष एकेरी गटात अंशुमान अग्रवालने अॅरोन फरियासवर ४-२ ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
पॅरा, व्हेटरन्स गटातही अटीतटीची स्पर्धा
पॅरा स्टँडिंग गटात चेतन सालगावकर विजेता, फ्लिव अँड्रेड उपविजेता ठरला. व्हीलचेअर गटात स्टॅनी डिसोझा विजेता, तर मोईसेस रोड्रिग्ज उपविजेता ठरला. व्हेटरन्स गटात नीरज कण्णुरे व मिथुन कंजी विजेते, रत्नदीप शिवाणी व राजेंद्र पार्सेकर उपविजेते ठरले. व्हेटरन्स एलिटमध्ये अभिनव जाजू व जॉन झेवियर विजेते, अमोघ नमशिकर व रोझलिन बुन्यान उपविजेते ठरले.