अर्थरंग : जागतिक अस्थिरतेच्या काळात 'डिफेन्स म्युच्युअल फंड' ठरले सुपरहिट

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th June, 11:40 am
अर्थरंग : जागतिक अस्थिरतेच्या काळात 'डिफेन्स म्युच्युअल फंड' ठरले सुपरहिट

मुंबई : जगभरात डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ धोरणे, तसेच इराण-इस्त्रायल संघर्षासारखे अनेक संकटे घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. भारतीय शेअर बाजारही या प्रभावापासून अलिप्त राहिला नाही. मात्र अशा अस्थिर कालखंडात ‘डिफेन्स’ क्षेत्राशी संबंधित म्युच्युअल फंड्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊन सकारात्मक धक्का दिला आहे.

गेल्या सहा महिन्यांत या क्षेत्रातील पाच म्युच्युअल फंड स्कीम्सनी ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला असून, जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही या योजनांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.

टॉप-५ डिफेन्स म्युच्युअल फंड्सचा आढावा:

१)  मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स ETF

२१ ऑगस्ट २०२४ रोजी सुरू झालेल्या या योजनेने ३२.४३% परतावा दिला आहे. याचे AUM ४६३ कोटी असून खर्चाचा अनुपात (Expense Ratio) फक्त ०.४१% आहे. यात अवघ्या ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.

२)  ग्रो निफ्टी इंडिया डिफेन्स ETF

८ ऑक्टोबर २०२४ ला लॉन्च झालेल्या या फंडाने ३२.०७% परतावा दिला आहे. १८३ कोटींचे AUM आणि ०.४३% खर्चाचा अनुपात आहे.

३)  मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड (रेग्युलर प्लॅन)

या फंडाने ३१.९२% परतावा दिला असून त्याचे AUM तब्बल ३,७७६ कोटी रुपये आहे. मात्र, खर्चाचा अनुपात १.१०% आहे.

४)  ग्रो निफ्टी इंडिया डिफेन्स ETF FOF

११ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झालेल्या या फंड-ऑफ-फंड्स योजनेने ३१.६७% परतावा दिला आहे. याचे AUM ६१ कोटी असून ०.६३% खर्चाचा अनुपात आहे.

५) आदित्य बिर्ला सन लाइफ निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड (रेग्युलर प्लॅन)

या फंडाने ३१.५९% परतावा दिला आहे. त्याचे AUM ६६४ कोटी आणि खर्चाचा अनुपात १.०६% आहे.

निवड करताना काय लक्षात घ्यावे?

या सर्व योजनांची ‘जोखीम’ श्रेणी 'अत्यंत उच्च' (Very High) आहे. त्यामुळे हे फंड केवळ आक्रमक धोरणे राबवून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे योग्य मानले जातात. तरीही, सध्याच्या जागतिक परिस्थितीत संरक्षण क्षेत्रातील वाढीच्या शक्यतांमुळे हे फंड आकर्षक ठरू शकतात.

हेही वाचा