गोवन वार्ताचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

प्रुडंट मीडियाच्या संचालकांनी वाटचालीचा घेतला आढावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th June, 12:51 am
गोवन वार्ताचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 'गोवन वार्ता', 'द गोवन', आणि 'भांगरभूंय'च्या दहाव्या वर्धापनदिनी केक कापताना संपादक पांडुरंग गावकर, महेश दिवेकर जोएल अफॉन्सो. सोबत प्रुडंट नेटवर्कचे संचालक ज्यो लुईस. प्रमोद आचार्य व इतर. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : बुधवारी ‘दैनिक गोवन वार्ता’, ‘भांगरभुई’ आणि ‘दी गोवन’ या वृत्तपत्रांचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रुडंट मीडियाचे संचालक ज्यो लुईस, संचालक संपादक प्रमोद आचार्य, संपादक सुयश गावणेकर, गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर, भांगरभूंयचे संपादक महेश दिवेकर, द गोवनचे संपादक जोएल अफॉन्सो व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त तिन्ही वृत्तपत्रांवर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी ज्यो लुईस यांनी मागील दहा वर्षांत या तिन्ही वृत्तपत्रांच्या वाटचालीचा आढावा घेतला. या दहा वर्षांत आलेल्या अडचणीवर मात करून तिन्ही वृत्तपत्रे भक्कमपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमोद आचार्य यांनी तिन्ही वृत्तपत्रांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण करून एक ब्रँड तयार केल्याचे सांगितले.
दरम्यान, काँग्रेस प्रदेश अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कार्यालयाला भेट देऊन 'गोवन वार्ता' समूहाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

('गोवन वार्ता' समूहाला शुभेच्छा देताना काँग्रेस प्रदेश अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव.)         

हेही वाचा