डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना थेट इंग्लंडमधून 'प्रस्ताव'; काय आहे प्रकार, वाचा सविस्तर...

ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
10th June, 11:38 am
डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना थेट इंग्लंडमधून 'प्रस्ताव'; काय आहे प्रकार, वाचा सविस्तर...

पणजीः आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉतील डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्याशी केलेल्या गैरवर्तनावरून राज्यातील डॉक्टरांनी आंदोलन छेडलेले असतानाच हा विषय आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहोचलेला आहे. इंग्लंडमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. किथ सियाउ यांनी चक्क डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना आपल्यासोबत इंग्लंडमध्ये वैद्यकीय सेवा बजावण्यासाठी यावे असा प्रस्ताव देखील दिला आहे. त्यासंदर्भातील त्यांनी केलेले ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.



सध्या व्हायरल होत असलेल्या त्या फोटोमध्ये इंग्लंडमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. किथ सियाउ यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना आपल्यासोबत इंग्लंडमध्ये वैद्यकीय सेवा बजावण्यासाठी यावे असा प्रस्ताव दिला आहे. तसेच त्या प्रस्तावाला दुजोरा देत गोव्यातील हेल्थ कोच डॉ. अंशुल यांनी 'डॉ. रुद्रेश यांनी  ही संधी स्वीकारावी, आणि आपल्या कामाची कदर करणाऱ्या देशात सेवा बजावावी', असा त्या ट्विटला रिप्लाय केला आहे. 

दरम्यान गोमेकॉतील त्या प्रकरणावर सोमवारी आंदोलन छेडलेल्या डॉक्टरांची भेट घेत त्यांना आंदोलन थांबवण्याचा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. आंदोलक डॉक्टरांच्या मागण्या तत्काळ मान करण्यासह, गोमेकॉत यापुढे​ असे प्रकार घडू नयेत यासाठी शिस्तपालन समितीची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. शिवाय, गरज भासल्यास मंगळवारी​ गोमेकॉत जाऊन डॉक्टरांशी चर्चा करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

हेही वाचा