हैदराबाद : गोव्याला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढताना तोल गेल्याने पडला

नवविवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
हैदराबाद : गोव्याला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढताना तोल गेल्याने पडला

हैदराबाद : गोव्याला जाण्यासाठी ट्रेन पकडताना एका २८ वर्षीय नवविवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. वुरुगोंडा साई असे या तरुणाचे नाव असून, तो एका खासगी कंपनीत काम करत होता. प्राथमिक माहितीनुसार त्याचे लग्न अवघ्या तीन महिन्यांपूर्वी (१२ मार्च) झाले होते. तो पत्नी आणि काही मित्रांसह गोव्यात सहलीसाठी होता.

घटना कशी घडली?

५ जून रोजी सकाळी ९.३० वाजता साई, त्याची पत्नी आणि त्याचे मित्र प्लॅटफॉर्म नंबर ९ वर आले. ते वास्को-द-गामा एक्सप्रेस पकडण्यासाठी थांबले होते. १०.३० च्या सुमारास, ट्रेन सुरू झाली होती. साई ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये पडला. त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

असे का झाले?

रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, साई किमान वेळा ट्रेनमध्ये चढून पुन्हा उतरला होता. तीनवेळा चढ-उतर केल्यानंतर शेवटी तोल जाऊन तो पडला, असे काही साक्षीदारांनी सांगितले. ही घटना पाहून स्टेशनवर असलेले प्रवासी हादरले. नवविवाहित साईचा असा अचानक मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा