बेळगावात गर्भवती महिलेला कोरोनाची लागण

एकाच दिवसात १९ रुग्ण आढळले, ३५ सक्रिय रुग्ण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th May, 02:21 pm
बेळगावात गर्भवती महिलेला कोरोनाची लागण

बेळगावः देशभरात कोरोना साथीचा प्रसार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. बेंगळुरूमध्ये ९ महिन्यांच्या बाळाला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर, कोविड आता बेळगावात पोहोचला आहे.

बेळगावमधील एका २७ वर्षीय गर्भवती महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सदर गर्भवती महिला गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील पुणे येथे गेली होती असे समजते. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग आधीच वाढला असून ५० रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

आता, बेळगाव जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. काल कर्नाटकात एकाच दिवसात १९ रुग्ण आढळून आले असून ३५ सक्रिय रुग्ण आहेत. बेळगाव जिल्ह्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. पी. गडाद यांनी सदर माहिती पत्रकार परिषदेत दिली. 

हेही वाचा