तंदुरी चिकन शीख कबाब

Story: चमचमीत रविवार |
7 hours ago
तंदुरी चिकन शीख कबाब

साहित्य  

चिकन अर्धा किलो, एक चमचा आले लसूण पेस्ट, एक हिरवी मिरची बारीक चिरून, एक चमचा कसुरी मेथी, एक चमचा भाजलेली जिरा पावडर, एक चमचा भाजलेली धणे पावडर, एक चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, दोन कांदे बारीक कापून, दोन चमचे मैदा, दोन चमचे कॉर्नफ्लॉवर, चवीपुरते मीठ, लिंबू रस अर्धा चमचा, थोडी पुदिन्याची पाने बारीक कापून, थोडी कोथिंबीर बारीक कापून, चीज दोन क्यूब, एक चमचा बटर, थोडी हिरवी वेलची पावडर किंवा थोडे गुलाब पाणी.

कृती

सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे. व चांगले कालवून घ्यावे. मधोमध एक वाटी ठेवून त्यावर पेटलेला कोळसा ठेवून त्यावर बटर सोडावे आणि लगेच त्यावर झाकण ठेवून आलेला धूर त्यात मुरू द्यावा म्हणजे कबाबला तंदूरचा छान सुगंध येतो. एक पेन्सिल घेऊन त्यावर हे मिश्रण थोडे थोडे लावून लांबट आकाराच्या शीख कबाबाला आकार द्यावा व अलगद काढून शॅलो फ्राय करावे. मेयोनिज किंवा हिरव्या चटणीसोबत छान लागतात.


कविता आमोणकर