क्रिमी चिकन सँडविच

Story: चमचमीत रविवार |
10 hours ago
क्रिमी चिकन सँडविच

साहित्य  

बोनलेस चिकन – अर्धा किलो, १ कप मेयोनीज, अर्धा कप क्रिम, १ कप भरून बारीक किसलेला कोबी, पाऊण कप बारीक चिरेलली कांद्याची पात, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ, सँडविच ब्रेड स्लाईसेस, १ मोठा चमचा आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा काळीमिरी दाणे, एक वेलची, एक इंच दालचिनी तुकडा, २ लवंगा.

कृती

चिकन साफ करून त्यात काळीमिरी दाणे, वेलची, दालचिनी, आले-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घालून पुरेसे पाणी घालून शिजवून घ्या. चिकन शिजल्यावर हाताने कुस्करून घ्या. एका पातेल्यात हे कुस्करलेले चिकन, पातीचा कांदा, कोबी, काळीमिरी पावडर घालून एकत्र करा आणि त्यात आवडीनुसार क्रिम, मेयोनीज घाला आणि एकत्रित करा. ब्रेड स्लाइस घेऊन कडा काढून टाका. तयार केलेले मिश्रण ब्रेड स्लाइसवर लावून त्यावर हवे असल्यास काकडीच्या चकत्या आणि लेट्यूसचे पान ठेवा. चविष्ट असे क्रिमी चिकन सँडविच तयार आहे.


कविता आमोणकर