मडगावात पूर्ववैमनस्यातून जबर मारहाण

पोलिसांकडून तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 11:45 pm
मडगावात पूर्ववैमनस्यातून जबर मारहाण

मडगाव : येथील ओल्ड स्टेशन रोडवर संशयित सुजीत सिंग, दिलीप कुमार व सुनील सिंग (रा. आके, मूळ उत्तरप्रदेश) या तिघांनी तक्रारदार रघुवेंद्र द्विवेदी याला हातोडी व लोखंडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मडगाव ओल्ड स्टेशन रोडवर ही मारहाणीची घटना बुधवारी रात्री १ वाजता घडली. या प्रकरणी रघुवेंद्र द्विवेदी याने मडगाव पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. संशयित सुजीत सिंग, दिलीप कुमार व सुनील सिंग यांनी ही मारहाण केली. सुनील सिंग याने रघुवेंद्र द्विवेदी याला पकडून ठेवले व संशयित सुजीत सिंग व दिलीप कुमार यांनी लोखंडी दांड्याने व हातोडीने रघुवेंद्र यांना मारहाण केली. रघुवेंद्र यांचे पाय जायबंदी केले असून अंगावर इतर ठिकाणीही जखमा आहेत. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी तिन्ही संशयितांविरोधात हत्यारांनी मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनुष्का परब पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, तक्रारदार रघुवेंद्र द्विवेदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यात तिन्ही संशयित हे मूळ उत्तरप्रदेशातील असून गोव्यातून उत्तरप्रदेशात मद्याचा साठा पाठवण्याचा त्यांचा धंदा सुरू आहे. त्याची माहिती आपण देत असल्याच्या संशयातून आपणास मारहाण करण्यात आली. त्यांचा हा बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याची व त्यांच्यावर याआधीही गुन्हे नोंद असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी द्विवेदी यांनी केली आहे. 

हेही वाचा