पणजी : दत्तगुरू सावंत, शैलेश नार्वेकर, निनाद देऊलकर यांच्यासह राज्यातील ५० पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश एकाच वेळी जारी झाला आहे.
पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांची सुरक्षा विभागातून (पणजी) पणजी किनारपट्टी सुरक्षा विभागात बदली झाली आहे. आदेशानुसार, गिरेंद्र नाईक हे मांद्रेचे, निनाद देऊलकर हे मोपा विमानतळ पोलीस स्थानकाचे तर चेतन सौळेकर हे हणजुण पोलीस स्थानकाचे नवे पोलीस निरीक्षक असतील.
हिरू कवळेकर यांची रायबंदर गुन्हे शाखेत, गौरेश परब यांची पोलीस मुख्यालयात, सोमनाथ माजिक यांची तेरेखोल किनारी सुरक्षा पोलीस स्थानकात तर, शरीफ जॅकीस यांची मुरगाव पोलीस स्थानकाच्या निरीक्षकपदी बदली झाली आहे.
दरम्यान, कार्मीक खात्याने जारी केलेल्या दोन वेगवेगळ्या आदेशांत, आयपीएस अधिकारी टिकम सिंग वर्मा यांची दक्षिण गोवा अधीक्षकपदी तर सुनीता सावंत यांची एएनसीच्या अधीक्षकपदी बदली केली आहे.
बातमी अपडेट होत आहे.