काँग्रेसचे पणजीतील इडी कार्यालयासमोर धरणे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 12:16 am
काँग्रेसचे पणजीतील इडी कार्यालयासमोर धरणे

पणजी : नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याच्या कृतीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पणजीतील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. देशात असलेल्या ज्वलंत समस्यांवरुन जनतेचे लक्ष हटवण्यासाठी आणि विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार ईडीचा गैरवापर करत आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पणजीतील पाटो येथील ईडी कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी इमारतीचे गेट बंद करून त्यांना बाहेर अडवले आणि आत जाण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी गेटच्या बाहेर बसून सरकारचा निषेध करणे सुरूच ठेवले. यावेळी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा आणि इतर काँग्रेस संघटनांचे नेते उपस्थित होते.

आज देश बेरोजगारी, महागाई, महिलांवरील अत्याचार, बलात्कार आणि खून यासारख्या मोठ्या समस्यांना तोंड देत आहे. मात्र, सरकारकडून काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना ईडीसमोर आणण्याचे षड्यंत्र रचून विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचे अमित पाटकर यांनी सांगितले. 

हेही वाचा