पेडणे : एका अल्पवयीन दलित मुलीला मारहाण केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी समीर कोरगावकर याच्या विरूद्ध गोवा बाल कायदा आणि एससी एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.
मुलीच्या पालकांनी पोलीस स्थानकात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगी घराजवळच असलेल्या किराणा दुकानात जाताना, समीर कोरगावकर याने तिला उद्देशून अपमानकारक शब्द वापरले. त्यानंतर अश्लील भाषा वापरून तिचा विनयभंग केला.मुलीने विरोध केला असता,आरोपीने तिचा टीशर्ट फाडून तिला मारहाण केली.तसेच तिला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे.
गोव्यात २०१८ ते २०२२ दरम्यान ॲट्रॉसिटी कायद्यान्वये ३७ गुन्हे नोंद
अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्या अंतर्गत गोव्यात २०१८ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण ३७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जातींवरील अत्याचाराची २२ प्रकरणे आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचाराची १५ प्रकरणे नोंद झाली आहेत.
बातमी अपडेट होत आहे.