सुर्ल-सत्तरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाचा ८५.७१ टक्के निकाल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th April, 11:57 am
सुर्ल-सत्तरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाचा ८५.७१ टक्के निकाल

पणजी : सुर्ल-सत्तरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाचा २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील दहावीचा निकाल ८५.७१ टक्के लागला. विद्यालयातून परीक्षेला एकूण सात विद्यार्थी बसले होते त्यातील सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

संकल्प गांवकर याने ८१ टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. निखिल गांवकर याने ७७. ५० टक्के गुण मिळवत द्वितीय तर, दीपिका पिंगळे हीने ७६.८३ टक्के मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. रामचंद गांवकर याने ६८.३३ टक्के मिळवत चौथा, समृद्धी गावडे हीने ५६.५५ टक्के मिळवत पाचवा तर, गौतमेश गांवकर याने ४९.८३ टक्के गुण मिळवून सहावा क्रमांक मिळवला. 

ग्रामीण भागातील या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे त्यांचे कौतुक होत आहे. शिक्षक विभा सालेलकर, मोहिनी हरवळकर, हर्षा परब, निशांत गावंकर , कपिल नाईक, अक्षता गावंकर, अक्षय गावंकर, शाळेचे मुख्याध्यापक देविदास कोटकऱ तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा