त्याच्या सोबत असलेल्या अन्य एकाला वाळपई पोलिसांनी घेतले ताब्यात
पणजी : सत्तरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकारीसाठी जंगलात गेलेल्या दोघा युवकांपैकी एकाचा गोळी लागून मृत्यू झाला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ त्याला वाळपई येथे रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. हेमंत देसाई (अडवई-सत्तरी) असे मृत युवकाचे नाव असून, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवण्यात आला आहे. त्याच्यासोबत असलेल्या अभिजीत देसाई यास वाळपई पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरु केला आहे.
* पाटवळ-वाळपई येथे शिकारी दरम्यान गोळी लागून एकाचा मृत्यू
दरम्यान गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाळपईच्या पाटवळ येथील जंगलात आपल्या मित्रांसोबत शिकारीला गेलेल्या समद खान या २१ वर्षीय युवकाचा गोळी लागून मृत्यू झाला होता. शिकारीवर बंदी असूनदेखील नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर यानंतर वाळपई पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली.
चिंचमळ आणि आसपासच्या शंभरपेक्षा जास्त घरांची झाडाझडती घेण्यात आली. त्याचप्रमाणे अनेकांचे जबाब नोंद करण्यात आले. यानंतर बाबू उमर संगर (३८, चिंचमळ म्हाऊस), गौस नूर अहमद (म्हाऊस) व अल्ताफ (नाणूस) यांना पोलिसांनी अटक केली. जानेवारीत अजून दोघांना अटक करण्यात आली. पण प्रकरण नंतर निवळले व सर्वांची जामिनावर सुटकाही झाली.
बातमी अपडेट होत आहे.