नाट्यसंपदा-भोमा संस्थेचे ‘द इन्सिडियस’ प्रथम

कला अकादमी कोंकणी नाट्यस्पर्धा : नागेश महालक्ष्मी, बांदिवडे यांचे ‘फायनल ड्राफ्ट’ द्वितीय

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
22nd March, 12:15 am
नाट्यसंपदा-भोमा संस्थेचे ‘द इन्सिडियस’ प्रथम

‘द इन्सिडियस’ नाटकातील एक दृश्य.

पणजी :
कला अकादमी कोंकणी नाट्यस्पर्धेत सत्यम शिवम सुंदरम नाट्यसंपदा, भोमा-फोंडा या संस्थेच्या ‘द इन्सिडियस’ नाटकाला १ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज, बांदिवडे-फोंडा यांच्या ‘फायनल ड्राफ्ट’ या नाटकाला ७५ हजारांचे द्वितीय, तर पहाट, गावडोंगरी-काणकोण यांच्या ‘अनकन्डीशनल लव्ह’ नाटकाला ५० हजारांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
उत्तेजनार्थ २५ हजारांचे पारतोषिक अंत्रुज घुडयो, बांदोडा यांच्या ‘डॅडी’ व मुष्टिफंड संस्था, पणजी यांच्या ‘सुरींग’ नाटकाला मिळाले आहे. दिग्दर्शनासाठी पहिले १० हजार रुपयांचे पहिले बक्षीस ‘द इन्सिडियस’साठी शेफाली संदीप रेश्मा नाईक, दुसरे रु. ७,०००चे बक्षीस ‘अनकन्डीशनल लव्ह’साठी दयानंद गायक यांना, तर तिसरे रु. ५,०००चे बक्षीस ‘फायनल ड्राफ्ट’साठी सुशांत नायक यांना जाहीर झाले आहे. वैयक्तिक अभिनयासाठी (पुरुष) पहिले बक्षीस (रु.७,०००) सुशांत नाईक (प्रोफेसर : फायनल ड्राफ्ट), दुसरे (रु.५,०००) दयानंद गायक (महेंद्र : अनकन्डीशनल लव्ह) यांना मिळाले आहे.
प्रमाणपत्रे : संतोष शेटकर, दयानंद राणे, शाबलो गावकर, श्रावण फोंडेकर, सुरेल तिळवे, चंद्रकांत मांजरेकर, अनिल वेर्णेकर, कुंदन गावस, दुर्गादास नारु नायक, गुरुदास नायक, लौकिक देसाय, खास शिफारस - दिव्यांक कामत.
वैयक्तिक अभिनयासाठी (स्त्री) पहिले बक्षीस शेफाली संदीप नाईक (मुग्धा : द इन्सिडियस), दुसरे डॉ. संस्कृती रायकर (चली : फायनल ड्राफ्ट) यांना मिळाले आहे.
प्रमाणपत्रे : गिरीजा गायक, माधुरी शेटकर, दुर्गा देसाई, आलिशा मिनेझिस, खिलौनी गावस चांदेलकर, साईली नाईक, खुशबू कवळेकर, दुर्वा दुर्गादास नायक, करुणा च्यारी, मुस्कान कामत, चंद्रकला मळीक.

नेपथ्यासाठी राजन नाईक यांना बक्षीस
नेपथ्य : राजन नाईक (द इन्सिडियस), प्रमाणपत्र : मोहित विश्वकर्मा (डॅडी). वेशभूषा : बिना कामत शंखवाळकार (सुरींग), प्रमाणपत्र : रोशन देसाई (राकस). प्रकाशयोजना : तेजस खेडेकर (द इन्सिडियस), प्रमाणपत्र : सदानंद वळवईकर (डॅडी). रंगभूषा : प्रेमानंद पोळे (बे-रंगारी), प्रमाणपत्र : रामा राऊत (घट्टाण.... कोणाचें?). पार्श्वसंगीत : दिलीप वझे (द इन्सिडियस), प्रमाणपत्र : सागर गावस (साद अंतर मनाचो). लेखन : (नवीन संहिता) वैभव गोविंद कवळेकर (द इन्सिडियस), अविनाश च्यारी (आमचा कूळ). खास स्पर्धेखातीर रुपांतरित संहिता : मुकेश थळी (फायनल ड्राफ्ट).    

हेही वाचा