पेडणे : केरी-पेडणे येथे एका विहिरीत पडून रानडुकराच्या दहा पिलांचा दुर्दैवी अंत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
पेडणे : केरी-पेडणे येथे एका विहिरीत पडून रानडुकराच्या दहा पिलांचा दुर्दैवी अंत

पेडणे :  मधलावाडा केरी येथे एका विहिरीत पडून रानडुकराच्या दहा पिलांचा मृत्यू झाला. आज सकाळी या घटनेची माहिती तुये येथील वनखात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून, आत पडलेल्या सर्व पिलांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.  

पाण्याच्या शोधात निघालेल्या या पिलांना विहीरीचा अंदाज न आल्याने आत पडली असावीत असा प्राथमिक अंदाज वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

 

हेही वाचा