जॉबवार्ता : राज्यातील ३७८ कंपन्यांकडून सुमारे २ हजार जणांना अप्रेंटिसशिप प्रशिक्षण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
जॉबवार्ता : राज्यातील ३७८ कंपन्यांकडून सुमारे २ हजार जणांना अप्रेंटिसशिप प्रशिक्षण

पणजीः सरकारची अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना लोकप्रिय होत आहे. गोव्यातून गेल्या चार वर्षांत सुमारे २ हजार जणांनी अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यांना राज्यात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या ३७८ कंपन्यांकडून प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या हवाल्याने समोर आली आहे.  

गोव्याबाबत थोडक्यात : 

गेल्या चार वर्षांत, २०९३ गोवेकरांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. २०२१-२२ साली ५२९ जणांनी आपले णाव नोंदवले होते. २०२२-२३ साली ७६६ आणि २०२३-२४ साली ७९८ लोकांनी आपले नाव नोंदवले. 

दरम्यान, अप्रेंटिसशिप प्रशिक्षण देण्यासाठी गोव्यात विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या एकूण ३७८ कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार २०२१-२२ साली ११८ कंपन्यांनी नोंदणी केली. २०२२-२३ साली १२३ तसेच २०२३-२४ साली १३७ कंपन्यांनी नोंदणी केली.  

लोकसभेच्या पटलावर लेखी उत्तर देताना केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्य मंत्री जयंत चौधरी यांनी गेल्या चार वर्षांत अप्रेंटिसशिप योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगितले. समोर आलेल्या एका आकडेवारीनुसार, २०२१-२२ ते २०२३-२४ या चार वर्षांत देशभरात ६.५७ लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. तर  ११ मार्च २०२५ पर्यंत, चालू आर्थिक वर्षात ४.७३ लाख लोकांनी अप्रेंटिसशिप योजनेसाठी नोंदणी केली आहे.

या योजनेविषयी थोडक्यात : 

तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि त्यांच्या कौशल्याचा विकास व्हावा या हेतूने भारत सरकारने राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजनेला चालना दिली. ही योजना मुंबई, कानपूर, चेन्नई आणि कोलकाता येथील प्रादेशिक अप्रेंटिसशिप प्रशिक्षण/व्यावसायिक प्रशिक्षण मंडळामार्फत राबविली जाते. 


या योजनेअंतर्गत,  नवीन पदविका आणि पदवीधरांना अप्रेंटिसशिप प्रशिक्षण प्रदान करण्यात येते. प्रशिक्षणादरम्यान पदवीधर अप्रेंटिसशिप करणाऱ्या तरुणांना प्रति व्यक्ती रु. ९,००० तर तांत्रिक पदवी पात्रता असलेल्या तरुणांना रु. ८,००० मानधन म्हणून दिले जाते. 

हेही वाचा