शिक्षण : केळशी येथे एआय आधारित कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रमाचा शुभारंभ

लुपिन फाऊंडेशन, वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशन, केळशी ग्रामपंचायत आणि दिशा एआय एडुटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले उपक्रमाचे आयोजन.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11 hours ago
शिक्षण : केळशी येथे एआय आधारित कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रमाचा शुभारंभ

पणजी : पारंपरिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय व्हावा या हेतूने सेंट ॲन्स हायस्कूल, केळशी येथे एआय आधारित कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाऊंडेशनने वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशन, ग्रामपंचायत केळशी आणि दिशा एआय एडुटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. 




या कार्यक्रमाद्वारे  करियर गाईडन्स, वैयक्तिकृत शिक्षण मार्ग (पर्सनलाइज्ड एड. मॅप) आणि कौशल्य विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे संचलित उपायांचे सादरीकरण करून  या क्षेत्रातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी हेरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन १२ मार्च रोजी करण्यात आले होते. यानंतर १५ मार्च रोजी, विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित केले गेले.  तर, १६ मार्च रोजी अहवाल वितरण आणि पालक समुपदेशन करण्यात आले. 


१०० विद्यार्थ्यांनी घेतले वैयक्तिक मार्गदर्शन

दोन दिवसांत इ. ७, ८ आणि ९ च्या सुमारे १०० विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळाले. या उपक्रमामुळे शैक्षणिक आणि करिअर आकांक्षांमधील अंतर कमी झाले. मार्गदर्शन सत्रे, कौशल्य मूल्यांकन आणि वैयक्तिक समुपदेशन वैशिष्ट्यीकृत होते. एआय-आधारित अहवाल विश्लेषण आणि करिअर मॅपिंगने योग्य करिअर मार्ग सुचवण्यात आले. 



दिशा एआयला नॅसकॉमने एडुटेकमध्ये अग्रणी म्हणून मान्यता दिली आहे. विद्यार्थी आणि शाळांना राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० शी जोडण्याचे ध्येय  दिशा एआयने बाळगले आहे.  लुपिन फाऊंडेशनच्या पाठिंब्यामुळे कार्यक्रमाला यश मिळाले.  लुपिन फाऊंडेशनचे उपक्रम शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक विकासावर कार्य करण्यास प्रयत्नरत आहेत. 
हेही वाचा