गोवा : गोव्यात ग्रामीण डाक सेवकांच्या ७३ जागा रिक्त

राज्यसभेत केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री डॉ. प्रम्मासानी चंद्र शेखर यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून मिळाली ही माहिती.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
7 hours ago
गोवा : गोव्यात ग्रामीण डाक सेवकांच्या ७३ जागा रिक्त

पणजी : संपूर्ण देशात टपाल खात्यात ग्रामीण डाक सेवकांची २१ हजार ४१३ पदे रिक्त आहेत. यातील गोव्यातील ७३ पदांचा समावेश आहे. ही पदे भरण्यासाठी खात्याने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री डॉ. प्रम्मासानी चंद्र शेखर यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार सदानंद शेट तानावडे यांनी अतारांकीत प्रश्न विचारला होता. 

उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात ग्रामीण डाक सेवकांची ४०७ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यातील उत्तरेत २३० तर दक्षिणेत १७७ पदे आहेत. सध्या उत्तर गोव्यात ३५ तर दक्षिण गोव्यात ३८ पदे रिक्त आहेत. ग्रामीण डाक सेवक ४५ दिवसांपेक्षा अधिक दिवसांसाठी रजेवर गेल्यास त्यांना आपल्या जागी बदली उमेदवार द्यावा लागतो. आवश्यक त्या सर्व अटी पूर्ण केले तरच बदली उमेदवारी जागी काम करू शकतात. 

सध्या गोवा टपाल विभागात दीर्घ रजेवर गेलेल्या ग्रामीण डाक सेवकांच्या बदल्यात ३६ बदली उमेदवार काम करत आहेत. ग्रामीण डाक सेवकांची भरती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. सध्या २१,४१३ पदांची भरती ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे यामध्ये पारदर्शकता आहे. घटनेच्या कलम १६(२) नुसार नागरिकांना सार्वजनिक भरती करताना जात, धर्म, पंथ, लिंग, प्रदेश अशा निकषांवर भेदभाव करता येत नसल्याचे उत्तरात म्हटले आहे.


हेही वाचा