बेळगाव : शेताच्या बाजूलाच असलेल्या खाणीत बुडून १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
8 hours ago
बेळगाव  : शेताच्या बाजूलाच असलेल्या खाणीत बुडून १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव : नावगे (ता. बेळगाव) येथे रविवारी (दि. १६) सायंकाळी एका शेताच्या शिवाराशेजारी असलेल्या खाणीत पाय घसरून पडल्याने  महादेव हणमंत पाटील (वय १४, रा. बहाद्दरवाडी) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

प्राप्त माहितीनुसार महादेव आपल्या धाकट्या भावासह नावगे येथील शिवारात गेला होता. फिरून झाल्यानंतर दोघे बाजूच्या खणीत हातपाय धुण्यासाठी गेले. यावेळी महादेवचा पाय घसरून तो पाण्याने भरलेल्या खाणीत पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला.

घरी परतल्यानंतर महादेव दिसत नसल्याने त्याच्या वडिलांनी धाकट्या भावाकडे विचारणा केली. त्याने हा प्रकार सांगताच आईने हंबरडा फोडला. वडिलांनी गावकऱ्यांना माहिती दिली. वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने शोध घेतल्यावर खणीत महादेवचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद वडगाव पोलीस स्थानकात करण्यात आली असून उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा