ट्रेंडिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी गत जन्मात होते छ. शिवाजी महाराज !

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
ट्रेंडिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी गत जन्मात होते छ. शिवाजी महाराज !

नवी दिल्ली: भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी पंतप्रधान मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक  विधान केल्याने  खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गत जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते असे ते म्हणाले.  त्यांच्या या विधानानंतर, उपसभापतींनी त्यांचे विधान सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचे आदेश दिलेत. 

प्रदीप पुरोहित


नेमके काय म्हणाले प्रदीप पुरोहित ?

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गतजन्मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून झाला होता. म्हणूनच ते राष्ट्र उभारणीत काम करत आहे असे गिरिजा बाबा नावाच्या एका संताने त्यांना सांगितल्याचे भाजप खासदार प्रदीप पुरोहित म्हणाले.

विरोधकांनी लक्ष्य केले

भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्या या विधानावरून गदारोळ झाला. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावरही बरीच टीका होत आहे. 'अविभाजित भारताचे पूजनीय दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि जगभरातील शिवभक्तांच्या प्रतिष्ठेला कलंक लावण्यासाठी भाजप नेतृत्वाकडून एक सुनियोजित कट रचला जात आहे.' या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केला आहे. आता या भाजप खासदाराचे हे घृणास्पद विधान ऐका.' असे कॅप्शन देत काँग्रेस खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी भाजप खासदाराचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. संबंधित खासदाराला निलंबित करावे अशीही मागणी सोशल मिडियावर जोर धरू लागली आहे. 

हेही वाचा