आर्लेम राय येथील अपघातात दोघे जखमी, कारचालकावर गुन्हा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
आर्लेम राय येथील अपघातात दोघे जखमी, कारचालकावर गुन्हा

मडगाव : आर्लेम राय येथील लिव्हरमेंट चर्चनजीक भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकी पुढे जात बसची वाट पाहणार्‍या मुलीवर आदळली व गटारात पडली. यात मुलीला व दुचाकीचालकाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी कारचालक पार्थ राजेश भानुशाली (रा. फोंडा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा येथील पार्थ भानुशाली आपल्या ताब्यातील रेनॉल्ट कार घेऊन फोंडा येथून मडगावच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते. आर्लेम राय येथील लिव्हरमेंट चर्चनजिक अनिता जनरल स्टोअरसमोर आली असता कारची धडक पुढे जाणार्‍या होंडा अॅक्टिव्हा स्कुटरला बसली. दुचाकीचालक सुकारो पांगो हे दुचाकीसह पुढे गेले व कच्च्या रस्त्यावर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या वोज्त्याला नेदलिन साल्वाकाओ फर्नांडिस (रा. व्हाइट हाऊस, राय) हिल‍ा धडक दिली. दुचाकीच्या धडकेने वोज्त्याला ही गटारात पडली व तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर दुचाकीचालक पांगो याच्या शरीरावर जखमा झाल्या व डावा पाय फॅक्चर झाला. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांकडून पंचनामा करत कारचालक पार्थ भानुशाली याच्याविरुद्ध वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद केलेला आहे. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण माजिक पुढील तपास करत आहेत.      

हेही वाचा