१६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून गरोदर केल्याचा आरोप
पणजी : वास्को येथील १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर करण्यात आले. या प्रकरणातील पीडित मुलीने संशयिताबरोबर प्रेमसंबंध असल्याचे तसेच त्याच्याबरोबर लग्न करण्यास तयार असल्याची न्यायालयात जबानी दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने मूळ बिहार येथील आणि वास्को येथे राहणाऱ्या २१ वर्षीय युवकाला २० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. याबाबतचा आदेश पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांनी दिला.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारी तिने दिली होती. त्यानुसार, पीडित मुलगी काही दिवसांनी सापडली. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता, ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानुसार वास्को पोलिसांनी या संदर्भात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पीडित मुलीची अधिक चौकशी केली असता, ती मूळ बिहार येथील आणि वास्को येथे राहणाऱ्या २१ वर्षीय युवकाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी संशयित युवकाला अटक केली. याच दरम्यान पीडित मुलीची न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंद केली असता, तिचे संशयित युवकाबरोबर प्रेमसंबंध होते. तसेच त्याच्याशी लग्न करणार असल्याचा जबाब दिला. मात्र, याची माहिती पीडित मुलीच्या नातेवाईकांना नव्हती. त्यानंतर पोलिसांनी संशयित युवकाला अटक केली. या प्रकरणी संशयिताने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, वरील माहिती न्यायालयात सादर करण्यात आली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने संशयित युवकाला २० हजार रुपयाच्या व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.