श्रीलंका : प्रवासी रेल्वेची हत्तींच्या कळपाला धडक; दुर्घटनेत ६ हत्तींचा मृत्यू

दरवर्षी लंकेत रेल्वे अपघातात सरासरी ४५ हत्तींचा मृत्यू होतो. गेल्यावर्षी सर्वाधिक ७३ हत्तींचा बळी गेला होता.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st February, 01:10 pm
श्रीलंका : प्रवासी रेल्वेची हत्तींच्या कळपाला धडक; दुर्घटनेत ६ हत्तींचा मृत्यू

कोलंबो : श्रीलंकेतील हबराणा परिसरात गुरुवारी एक मोठा अपघात झाला. एका प्रवासी ट्रेन हत्तींच्या कळपाला धडकली ही टक्कर इतकी भीषण होती की या अपघातात सहा हत्तींचा मृत्यू झाला. दोन जखमी हत्तींवर उपचार सुरू आहेत. श्रीलंकेतील आतापर्यंतच्या सर्वात दुर्दैवी ट्रेन अपघातांत या  घटनेची नोंद झाली आहे. 


Sri Lanka passenger train kills six elephants | News | wfxg.com


श्रीलंकेत रेल्वे गाड्या आणि हत्तींमधील असे अपघात गेल्या २० वर्षांत अगदीच सामान्य झाले आहेत. वन्यजीव संवर्धन संघटनांच्या मते, दरवर्षी श्रीलंकेत सुमारे ७३ हत्ती रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. याशिवाय, गेल्या वर्षी येथील मानव-हत्ती संघर्षात १७० हून अधिक लोक आणि सुमारे ५०० हत्तींचा मृत्यू झाला.


Daily Mirror - Sri Lanka Latest Breaking News and Headlines - Print Edition  Two wild elephants die after being hit by train and electrocuted


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जंगलतोड आणि नैसर्गिक संसाधनांच्या कमतरतेमुळे हत्तींना आता मानवी क्षेत्रात प्रवेश करण्यास भाग पडत आहे. यामुळे ते रेल्वे रुळांवरुन, शेती-बागायती आणि गावांच्या दिशेने धाव घेत आहेत व पर्यायाने अपघातांचे बळी ठरत आहेत. रेल्वे अपघातांव्यतिरिक्त, अनेक हत्ती वीज पडल्याने, विषारी अन्न खाल्ल्याने तसेच शिकारीचे बळी ठरतात.


Assam loco pilots on the need for effective communication to prevent  elephant-rail collision


वन्यजीव तज्ञ आणि स्थानिक प्रशासन सतत रेल्वे चालकांना डोंगराळ भाग, जंगले आणि हत्तींच्या कॉरिडॉरमधून जाताना ट्रेनचा वेग कमी करण्याचे आणि हॉर्न वाजवून हत्तींना सावध करण्याचे आवाहन करत आहेत. तथापि, हा उपाय अद्याप पूर्णपणे प्रभावी असल्याचे सिद्ध झालेले नाही आणि अशा घटना घडतच राहतात.


The Video of an Elephant Hit by a Train in India was Heartbreaking –  RayHaber


दरम्यान हाबराणा येथील हा पहिलाच अपघात नाही. २०१८ मध्ये, त्याच भागात एका गर्भवती हत्तीणीचा आणि तिच्या दोन बछड्यांचा ट्रेनने धडकून मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, मिनेरिया भागात एका ट्रेनने हत्तींच्या कळपाला धडक दिली होती. यात दोन हत्तींचा मृत्यू झाला होता आणि एक जखमी झाला होता.


Tragic: Train hits and critically injures elephant in West Bengal | City -  Times of India Videos


श्रीलंकेत हत्तींना विशेष कायदेशीर संरक्षण आहे. देशात सुमारे १२,००० हून अधिक जंगली हत्ती (अधिकृत आकडा) आहेत. त्यांना तेथील बौद्ध समुदायाद्वारे पवित्र मानले जाते. श्रीलंकेत हत्तीला मारणे हा कायदेशीर गुन्हा आहे व यासाठी तुरुंगवास किंवा मोठ्या दंडाची तरतूद आहे. असे असूनही, मानव-हत्ती संघर्षाच्या वाढत्या घटना सरकार आणि वन्यजीव तज्ञांसाठी एक मोठे आव्हान ठरत आहेत.


Six elephants dead after being struck by train in Sri Lanka - BBC News

हेही वाचा