संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून धक्कादायक बाब आली समोर
नवी दिल्ली : कुख्यात दहशतवादी गट आयसिस भारतात अतिरेकी हल्ले करण्याचे मनसुबे आखत होता. पण, मोदी सरकारची रणनीती आणि गुप्तहेर एजन्सीने हे प्रयत्न हाणून पाडले. अशा आशयाचा खळबळजनक आहवाल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत करण्यात आला आहे. हे हल्ले लोन वुल्फ किंवा स्लीपर सेल्सच्या माध्यमातून करण्याची योजना होती, अशीही माहिती समोर आली आहे.
आयएसआयएल (दाएश), अल-कायदा आणि संबंधित व्यक्ती आणि संघटनांबाबतच्या विश्लेषणात्मक समर्थन आणि निर्बंध देखरेख पथकाच्या ३५ व्या अहवालानुसार, हे दहशतवादी गट आणि संबंधित संघटना कट रचत आहेत. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट या अतिरेकी संघटनेचा उद्देश आशिया खंडात खलिफा राजवट स्थापित करणे आहे. या दहशतवादी संघटनेला 'इस्लामिक स्टेट अँड दाएश' असेही म्हणतात.
भारताने जरी आपल्या लोकचे समर्थपणे रक्षण केले असले तरी, आयएसआयएल (दाएश) समर्थित 'अल-जौहर' माध्यमांनी त्यांच्या सीरत उल-हक या प्रकाशनातून भारताविरुद्ध प्रचार सुरूच ठेवला. अहवालात असेही म्हटले आहे की अफगाणिस्तानात दोन डझनहून अधिक दहशतवादी गट सक्रिय आहेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांचा असा विश्वास आहे की या देशाकडून निर्माण झालेला सुरक्षा धोका या प्रदेशात आणि त्यापलीकडे अस्थिरता निर्माण करत राहील. शिवाय, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला आयएसआयएल (दाएश) कडून निर्माण झालेल्या धोक्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या २० व्या अहवालात असे म्हटले आहे की दाएशने निर्माण केलेल्या धोक्यांमुळे परिस्थिती चिंताजनक आहे.