अर्थरंग : इनसायडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन : नेस्ले इंडिया सेबीच्या रडारवर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th March, 01:12 pm
अर्थरंग : इनसायडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन : नेस्ले इंडिया सेबीच्या रडारवर

नवी दिल्ली: नेस्ले इंडिया कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत  शुक्रवारी, नेस्ले इंडियाला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने 'प्रशासकीय चेतावणी पत्र' पाठवले. 

कंपनीने संबंधित व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही. कंपनीच्या नियुक्त व्यक्तीने सेबी (इनसाइडर ट्रेडिंग प्रतिबंध) नियम, २०१५ ('पीआयटी नियम') चे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीच्या अनुपालन अधिकाऱ्याला सेबीच्या उपमहाव्यवस्थापकांकडून प्रशासकीय चेतावणी पत्र प्राप्त झाले आहे असे निवेदन नेस्लेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्याने या घटनेचा  कंपनीच्या कामकाजावर काहीच परिणाम होणार नाही, ही माहिती सेबी लिस्टिंग नियमांच्या नियम ३० नुसार प्रदान करण्यात आली आहे, असे म्हटले आहे. 

हेही वाचा