'या' ठिकाणी होणार टेस्ला कंपनीचे भारतातील पहिले शोरूम

कंपनीने भारतात १३ हजार नोकऱ्यांसाठी जाहीरात काढली होती

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th March, 04:19 pm
'या' ठिकाणी होणार टेस्ला कंपनीचे भारतातील पहिले शोरूम

मुंबईः जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी, टेस्ला, मुंबईत भारतातील पहिलं शोरूम उघडणार असल्याची महत्त्वाची बातमी दिली आहे. ते मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये असेल. कंपनीनं अलीकडेच यासाठीचा अंतिम करार केलाय.

सूत्रांनुसार, टेस्ला बीकेसीमधील एका कमर्शियल टॉवरच्या तळमजल्यावर ४ हजार चौरस फूट जागा घेत आहे. तिथे कंपन्यांच्या गाड्यांची विक्री होणार आहे. या जागेसाठी कंपनी सुमारे ३५ लाख रुपये मासिक भाडे देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टेस्ला मोटर्स ही अमेरिकन कंपनी असून ती विद्युत उर्जेवर चालणारी गाडी बनवते. टेस्ला ही कंपनी सोलर पॅनल आणि सोलर रूफ बनवते. तसेच टेस्लाच्या गाड्यांच्या शानदार फीचर्स आणि टेक्नॉलॉजीमुळे ती जगातली सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार कंपनी आहे

मुंबईनंतर दिल्लीत होणार शोरूम
टेस्लाचं पुढील स्टोअर दिल्लीत उघडण्याची शक्यता आहे. मुंबईनंतर कंपनी दिल्लीत आपले स्टोअर उघडणार आहे. टेस्ला दिल्लीतील एरोसिटी कॉम्प्लेक्समध्ये दुसरे शोरूम उघडेल, अशी अपेक्षा आहे. 

सीईओ एलोन मस्क यांनी अलीकडंच पंतप्रधान मोदींची त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान त्यांची भेट दिली होती. यानंतर, कंपनीनं भारतातील १३ हजार नोकऱ्यांसाठी जाहीरात काढली होती.

एप्रिलपर्यंत सुरू होण्याची शक्यता
मुंबईतील बीकेसीमध्ये शोरूम उघडल्यानंतर आणि भारतात नोकऱ्यांसाठी रिक्त जागा दिल्यानंतर, टेस्ला एप्रिलपर्यंत भारतात प्रवेश करेल. त्यानंतर कंपनीची भारतात अधिकृतपणे कार विक्री सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. 

टेस्ला सध्या भारतात उत्पादन युनिट उभारणार नाही. तर टेस्ला जर्मनीतील बर्लिन-ब्रँडनबर्ग येथील गिगाफॅक्टरीमध्ये बनवलेल्या गाड्या भारतात आयात करणार आहे.

हेही वाचा