खैबर पख्तूनख्वा : मंगळवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथील एका दहशतवादी गटातील दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या दोन कार एका लष्करी संकुलात धडकवल्या. यानंतर मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले.
स्फोटानंतर अनेक दहशतवाद्यांनी कंपाऊंडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चकमक अजूनही सुरू आहे आणि सुरक्षा दल उर्वरित हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या हल्ल्याची जबाबदारी हाफिज गुल बहादूर गटाने घेतली आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने सुरू आहेत. भारताने पाकिस्तानमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार दिला होता.