कला आणि संस्कृती : चार वर्षांनंतर पुन्हा होणार डी डी कोसंबी महोत्सव

२४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th February, 12:41 pm
कला आणि संस्कृती  : चार वर्षांनंतर पुन्हा होणार डी डी कोसंबी महोत्सव

पणजी : गेली चार वर्षे विविध कारणास्तव बंद असलेला डी डी कोसंबी विचार महोत्सव पुन्हा एकदा होणार आहे. कला अकादमी पणजी येथे २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. सोमवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खात्याचे संचालक सगुण वेळीप, सचिव सुनील अंचिपका उपस्थित होते. 




गावडे यांनी सांगितले की, व्याख्यानमालेच्या १४ व्या आवृत्तीचे उद्घाटन २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ५ वाजता मोटिवेशनल स्पीकर गौर गोपाळ दास यांचे 'नातेसंबंध आणि आयुष्य' या विषयावर व्याख्यान होणार आहे. २५ रोजी प्रख्यात लेखिका अलका सरौगी या 'अँड इट सेज, सेव्ह मी फ्रॉम सुसाईड' या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. 




२६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता आदित्य गुप्ता हे ७ लाईफ लेसन फ्रॉम एवरेस्ट या विषयावर व्याख्यान देतील. २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता पद्मश्री निवेदिता भिडे यांचे स्वामी विवेकानंदांचे विचार यावर व्याख्यान होईल. तर २८ रोजी निवृत्त नौदल कमांडर अभिलाष टॉमी यांचे सेलिंग अराऊंड दि वर्ल्ड या विषयावर व्याख्यान होणार आहे. १३ वा डी डी कोसंबी महोत्सव २०२० मध्ये झाला होता. त्यानंतर कोविड, निवडणुका अशा विविध कारणांमुळे महोत्सव झाला नव्हता.मिळालेल्या माहितीनुसार २०२० नंतर २०२२ मध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मात्र तेव्हा व्याख्यात्यांच्या निवडीवरून वाद झाला होता.

Kala Academy, Goa - A Well Built Unbuilding - archEstudy

त्यामुळे संपूर्ण ही व्याखानमालाच रद्द करण्यात आली होती. असा असा वाद पुन्हा उद्भवू नये यासाठी सरकारने १० जणांची निवड समिती स्थापन केली होती. समितीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदस्य म्हणून काम पाहिले. यंदाचे व्याख्याते या समितीने निवडले आहेत.

हेही वाचा