प्रकल्पांना नावे देताना पण कॉंग्रेसची घराणेशाही : दामू नाईक

सरकारात असताना केवळ गांधी घराण्यातील व्यक्तींचीच नावे -कु‌जिरा ॲथलेटिक स्टेडियमला देणार अटलजींचे नाव

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
46 mins ago
प्रकल्पांना नावे देताना पण कॉंग्रेसची घराणेशाही : दामू नाईक

पणजी : काँग्रेसने (Congress) सत्तेत असताना विकासासंबंधी प्रकल्पांना केवळ गांधी घराण्यातील व्यक्तींची नावे दिली. हा घराणेशाहीचा प्रकार ठरतो. भाजप (BJP) सरकारने अटलब‌िहारजी वाजपेयी, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच राष्ट्रपुरूषांची नावे देऊन त्यांचे कार्य तसेच आठवणींची जपणूक करण्याचा प्रयत्न केला, असे प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. 

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी (BJPs Goa State President Damu Naik)  आज पणजीत (Panjim) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी वरील माहिती दिली. स्व. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची नावे देण्यात गैर काहीच नाही. मात्र, एकाच घराण्यातील व्यक्तींची नावे देणे ही घराणेशाही ठरते. देशासाठी त्याग केलेल्या ‌किंवा मोठे योगदान दिलेल्या इतर राष्ट्रपुरुषांची ही प्रकल्पांना नावे देणे आवश्यक आहे. यासाठी भाजप सरकारने अटलबिहारी वाजपेयी, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, सरदार वल्लभभाई पटेल यांची नावे प्रकल्प तसेच योजनांना दिली असल्याचे दामू नाईक म्हणाले. 

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. कुजिरा येथील अॅथलेटिक स्टेडियमला अटलजींचे नावे देणार. इतर ठिकाणी पण त्यांचे नाव प्रकल्पांना देणार. अटलजींच्या जन्मदिनी आठवडाभर सर्व मतदारसंघांनी कार्यक्रम होणार. त्यांच्या जीवनावर आधारीत प्रदर्शन, कवी संमेलन होणार. कार्यक्रम करण्यासाठी उत्तर तसेच दक्षिण गोव्यात समित्या स्थापन केल्या असल्याची माहिती दामू नाईक यांनी दिली. 

हेही वाचा