दुचाकी चोरणाऱ्या दोन तरुणांना पणजी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चोरी केलेली गाडी जप्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
दुचाकी चोरणाऱ्या दोन तरुणांना पणजी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पणजी: कारंझाळे परिसरातून दुचाकी चोरल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी ताळगाव येथील दोन तरुणांना अटक केली आहे. जेडन डिसोझा (१९) आणि गौरक्ष गावस (१९) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारंझाळे भागातून एक दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पणजी पोलीस स्थानकात दाखल झाली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि गुप्त माहितीच्या आधारे ताळगाव येथील या दोन संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोघांनाही रीतसर अटक केली आहे.

पणजी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संशयितांची सखोल चौकशी सुरू आहे. या दोन्ही तरुणांचा अशाच प्रकारच्या इतर काही चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभाग आहे का, याचाही शोध आता पोलीस घेत आहेत.

हेही वाचा