व्हायरल : घोड्याने स्वतःचा जीव पणाला लावत वाचवले एकाचे प्राण

बुडणाऱ्या व्यक्तीसाठी देवदूत बनून झाला हजर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th February, 02:22 pm
व्हायरल :  घोड्याने स्वतःचा जीव पणाला लावत वाचवले एकाचे प्राण

शांघाय : प्राणी आणि माणसाचे नात्याबद्दल काय लिहावे ? अनादी काळापासून,  माणूस आणि प्राणी एकत्रच वाढले. कुत्रे, मांजर, घोडे, गाई-म्हशी, बोकड-शेळी इत्यादि प्राण्यांनी माणसाच्या जडणघडणात महत्वाची साथ दिली आहे. या सगळ्यात घोडा हा प्राणी सर्वात वरचढ असाच आहे. हे प्राणी इतके प्रमाणिक आणि प्रेमळ असतात की माणसाच्या एका इशाऱ्यावर प्रसंगी स्वतःचा जीवही धोक्यात घालतील. चीनच्या शांघाय प्रांतात देखील एक अशीच घटना घटना समोर आली आहे.  येथे एका घोड्याने आपल्या मालकाच्या इसका सुचेनवर खोल पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवले. पण यानंतर सहा दिवसांनी या घोड्याचा न्यूमोनियाने मृत्यू झाला. 

दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, सदर घोड्याचा मालक आणि हा सात वर्षांचा घोडा एका जियानतांव येथील नदी किनारी नेहमी सारखाच सराव करत होते. दरम्यान येथे नजीकच असलेल्या पूलांवरून जात असताना एक व्यक्ती पाण्यात पडली. दरम्यान सदर व्यक्तीच्या लहान मुलीने पूलावरून मदतीसाठी हाक मारली. काहीवेळाने  सरावानंतर नदीकिनारी विश्रांतीसाठी थांबले असता त्यांना हे दृश्य नजरेस पडले. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता ईलीबाय (घोड्याचा मालक) आणि बायलॉन्ग (घोडा) या दोघे नदीत शिरले. नदी खोल होती तसेच पाणी देखील जोरात वाहत होते. किनाऱ्यापासून सुमारे ३० मीटर पुढे पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला  ईलीबायने बखोट्याला पकडले व बायलॉन्गच्या पाठीवर त्याला ठेवत पाण्यातून बाहेर आले. यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला.

दरम्यान त्या दिवशी सायंकाळी बायलॉन्गची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली. चालतांना त्यांचे पाय थरथरू लागले. दुसऱ्या दिवशी त्याला तापाने घेरले. श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. दरम्यान तपासणीसाठी  पशू वैद्यास पाचारण करण्यात आले. त्याने औषधे दिली पण काही फरक पडला नाही,सातव्या दिवशी त्याचा न्यूमोनियाने मृत्यू झाला. ईलीबाय या घटनेने पुरताच हादरला आहे. पण  बायलॉन्गने एका लहान मुलीला पोरके होण्यापासून वाचवले आहे त्याने एका हीरो सारखी एक्जिट घेतली. असेही तो म्हणतो. दरम्यान जियानतांव प्रशासनाने बायलॉन्गच्या बलिदानाची जाणीव पुढील पिढीस व्हावी याकरिता नदीच्या ठिकाणी त्यांचे मोठे स्मारक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ईलीबायला प्रसंगावधान राखत एका मनुष्याचा जीव वाचवल्याप्रकरणी व नुकसान भरपाई म्हणून मोठी रक्कम देखील बक्षीस आणि अनुकंपा निधीच्या स्वरूपात देण्यात आली आहे. 


हेही वाचा