बार्देश : कुचेली येथे स्वयंअपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
12th February, 04:35 pm
बार्देश : कुचेली येथे स्वयंअपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

 म्हापसा :   कुचेली, म्हापसा येथे रस्त्याच्या कडेच्या संरक्षक कठड्याला धडक बसून झालेल्या स्वयंअपघातात गंभीर जखमी झालेल्या जाविटो घडामुडी (२८, रा. सडये शिवोली) या युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात गेल्या दि. ३  फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडला होता. जाविटो म्हापसा येथून कुचेली तीन माड मार्गे सडये येथे दुचाकीवरून घरी जात होता. तेव्हा कुचेली येथील सरकारी शाळे समोरील चढावावर त्याचे स्कुटरवरील नियंत्रण गेले आणि बाजूलाच असलेल्या एका घराच्या संरक्षण कठड्याला दुचाकीची धडक बसली.

 या अपघातात जाविटो घडामुडी याचे डोके दगडावर आपटले व तो गंभीर जखम होऊन बेशुध्दावस्थेत घटनास्थळी पडला. अपघाताची माहिती मिळाल्यावर १०८ रूग्णवाहिकेतून त्यास म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर पुढील उपचारार्थ त्यास गोमेकॉत हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना बुधवारी १२ रोजी सकाळी त्याचे निधन झाले.  सांयकाळी त्याच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलीस उपनिरीक्षक पंढरी चोपडेकर व हवालदार प्रितम दाभोळकर यांनी केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.   


हेही वाचा