ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांना लखनौच्या पीजीआई रुग्णालयात भरती करण्यात आले होते
अयोध्या : येथून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अयोध्या श्री राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. बुधवारी (१२ फेब्रुवारी) सकाळी ७ वाजता लखनऊ पीजीआय येथे सत्येंद्र दास यांनी अखेरचा श्वास घेतला. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर त्यांना अयोध्येहून लखनौला रेफर करण्यात आले.
दरम्यान आज बुधवारी सकाळी ७ वाजता, रुग्णालयाने एक प्रेस नोट जारी करून सत्येंद्र दास यांच्या निधनाची माहिती दिली. आचार्य सत्येंद्र दास यांचे पार्थिव अयोध्येत आणले जाईल. त्यानंतर ते आश्रम सत्यधाम गोपाळ मंदिरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल.
सत्येंद्र दास यांचा जन्म २० मे १९४५ रोजी संत कबीर नगर जिल्ह्यात झाला. सत्येंद्र दास यांचा लहानपणापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. सत्येंद्र दास यांनी त्यांच्या वडिलांना संन्यास घेण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा त्यांच्या वडिलांनीही आश्चर्य व्यक्त केले नाही. त्यांनी आशीर्वादही दिले. सत्येंद्र दास यांनी १९५८ मध्ये घर सोडले. १९९२ मध्ये त्यांची राम मंदिरात नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांना दरमहा १०० रुपये पगार मिळत असे. २०१९ मध्ये, अयोध्या आयुक्तांच्या सूचनेनुसार, त्यांचे वेतन १३,००० रुपये करण्यात आले.