बोणबाग- बेतोडा येथे टेम्पो - कार यांच्यात अपघात

सुदैवाने कारमधील चालकासहित ९ प्रवाशांना कोणतीही इजा नाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th February, 04:54 pm
बोणबाग- बेतोडा येथे टेम्पो - कार यांच्यात अपघात

फोंडा : बोणबाग- बेतोडा येथील धोकादायक बनलेल्या भर रस्त्यावर वळण घेणाऱ्या टेम्पोला कारची धडक बसून मंगळवारी सकाळी अपघात घडला. सुदैवाने कारमधून कर्नाटक राज्यात देवदर्शनासाठी जाणारे सर्व प्रवासी बालंबाल बचावले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून धोकादायक बनलेल्या बोणबाग येथील रस्त्यावर जीए-०५- टी -०८३३ प्रमाणाचे टेम्पो दुभाजक काढलेल्या ठिकाणी वळण घेत होता. त्यावेळी वास्को येथून प्रवाशांना घेऊन कर्नाटकात देवदर्शनासाठी जाणारी जीए-०६- एफ- ३८८१ क्रमांकाच्या कारची धडक त्या टेम्पोला बसली. 

मात्र सुदैवाने कारमधील चालकासहित सर्व ९ प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.अपघाताची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक मडसो गावकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. 

हेही वाचा