आयटीआर भरणाऱ्यांची संख्या वाढली

सरकारच्या कमाईत जोरदार वाढ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11th February, 11:21 am
आयटीआर भरणाऱ्यांची संख्या वाढली

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
दिल्लीः आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आयटीआर भरणाऱ्यांची संख्या ८ कोटींच्या वर गेली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये कर भरणाऱ्यांची संख्या ७० लाखांनी घटली आहे. म्हणजेच आयचीआर भरणाऱ्यांची संख्य वाढली असली तरी कर भरणाऱ्यांच्या संख्येत २०१९-२० च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ३३ टक्क्यांनी घटली आहे. 

तरी देखील सरकारने यातून चांगली कमाई केली आहे. लोकसभेत वित्त मंत्रालयाला प्रश्नोत्तराच्या तासात गेल्या पाच वर्षात आयटीआर भरणाऱ्यांची संख्या किती होती, असे विचारले होते. याशिवाय यापैकी किती जण कर भरतात हा प्रश्न विचारण्यात आला होता.

अर्थमंत्रालयाने त्यांच्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीनुसार २०१९-२० मध्ये आयटीआर भरणाऱ्यांची संख्या २,९०,३६,२३ होती. २०२४-२५ मध्ये आयटीआर भरणाऱ्यांची संख्या ८ कोटींवर गेली आहे. 

लोकसभेत दिल्या गेलेल्या उत्तरानुसार ८,३९,७३,४१६ लोकांनी आयटीआर भरला होता. मात्र, कर भरणाऱ्यांची संख्या कमी झाली. २०२४-२५ मध्ये ५,५७,९५,३५१ लोकांनी आटीआर भरला मात्र कर दिला नाही. प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या २ कोटी ८१ लाख ७८ हजार २५ इतकी होती.

केंद्र सरकारने प्राप्तीकराच्या रचनेत केलेल्या बदलांमुळे हा परिणाम झाला आहे. केंद्राने नवी कररचना अस्तित्वात आणली. याशिवाय आता निर्मला सीतारामन यांनी १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत दिलीय, त्यामुळे करदात्यांची संख्या १ कोटींपेक्षा कमी होईल. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात केवळ २ टक्के लोक खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष कराच्या रुपात प्राप्तिकर सरकारला भरतील. 

कर तज्ज्ञ गोपाल केडिया यांनी कर भरणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी सरकारला प्राप्तिकरातून मिळणारे उत्पन्न वाढले असल्याचे म्हटले. या आर्थिक वर्षात सरकारला २० लाख कोटी प्राप्तिकरातून मिळालेत अजूनही २ ते ३ लाख कोटी मिळतील, असे ते म्हणाले. आयकराच्या माध्यमातून होणारी कमाई २४ लाख कोटींपर्यंत जाऊ शकते.

हेही वाचा