शिक्षण : नीट यूजी २०२५ साठी नोंदणी सुरू: परीक्षेची तारीखही निश्चित

जाणून घ्या परीक्षेचा पॅटर्न

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
08th February, 04:16 pm
शिक्षण : नीट यूजी २०२५ साठी नोंदणी सुरू: परीक्षेची तारीखही निश्चित

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने नेशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट  (नीट युजी) २०२५ ची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा ४ मे २०२५ (रविवार) रोजी होणार आहे. नोंदणी प्रक्रिया neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर काल ७ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ती ७ मार्चपर्यंत चालेल. गेल्या वर्षी, या परीक्षेला विक्रमी २४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.  या परीक्षेद्वारे एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद, युनानी आणि सिद्धा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो.



* NEET UG 2025 साठी नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :

-सर्वप्रथम neet.nta.nic.in वर जा.

-यानंतर नीट युजी २०२५ नोंदणी लिंकवर क्लिक करा.

-त्यानंतर लॉगिन पेजवर आवश्यक माहिती भरा आणि नोंदणी पूर्ण करा.

-आता कागदपत्रे अपलोड करा, अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

-भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवावे. 


NTA Announces APAAR ID Integration for NEET UG 2025 Registration Process


 * अर्ज शुल्क

-सामान्य श्रेणी: १,७०० रुपये 

-ओबीसी, ईडब्ल्यूएस: १,६०० रुपये 

-अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, तृतीय पंथीय: १,००० रुपये 

-परदेशी नागरिक: ९,५०० रुपये 


NTA Releases Key Notice On NEET UG 2025 Admissions, Check Details


* नीट युजी २०२५ परीक्षेच्या पद्धतीत मोठा बदल

-परीक्षेचा वेळ २०० मिनिटांवरून १८० मिनिटे करण्यात आला आहे.

-एकूण प्रश्नांची संख्या २०० वरून १८० पर्यंत कमी करण्यात आली आहे.

-आता सर्व प्रश्न अनिवार्य असतील, कोणतेही पर्यायी प्रश्न नसतील.

-ही परीक्षा एकाच दिवशी आणि शिफ्टमध्ये पेन-पेपर पद्धतीने घेतली जाईल.


NEET UG 2025 On May 4: Know Test Pattern And Marking Scheme


* विषयवार प्रश्न

-जीवशास्त्र - ९० प्रश्न

-भौतिकशास्त्र - ४५ प्रश्न

-रसायनशास्त्र - ४५ प्रश्न


NEET UG 2025: NTA issues important notice for admission, details here |  Education - Hindustan Times


* परीक्षेतील हेराफेरी रोखण्यासाठी कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. 

नीट युजी २०२४ मध्ये पेपरफुटी आणि हेराफेरीच्या तक्रारी आल्यानंतर, सरकारने परीक्षा पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, भविष्यात नीट युजी परीक्षा ही बहु-स्तरीय चाचणी म्हणून घेतली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र आणि इतर अपडेट्ससाठी नियमितपणे neet.nta.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.


NEET UG 2025: Registration for NEET UG starts, know every detail from  application fee to details - informalnewz

 

हेही वाचा