अब्जावधी रुपयांचे नुकसान
नवी दिल्ली : देशातील निवडणुकांना खेळ मानणाऱ्या सट्टेबाजांना दिल्ली विधानसभेच्या निकालांनी योग्य उत्तर दिले आहे. राजस्थानचा फलोदी सट्टा बाजार असो, दिल्ली सट्टा बाजार असो किंवा महाराष्ट्र सट्टा बाजार असो, या सर्वांनी दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होईल असे भाकीत वर्तवले होते.
दिल्ली निवडणुकीनंतर एक्झिट पोल जाहीर झाले तेव्हाही सट्टेबाजांनी एक्झिट पोलवर विश्वास ठेवण्याऐवजी आम आदमी पक्षाचे सरकारच दिल्लीत स्थापन होईल असेच ठोकटाळे बांधले होते. दरम्यान आज दुपार होता होता सट्टेबाजाराचा बोजवारा दुलायाचे दिसून आले. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया सारख्या दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागल्याने सट्टा लावणाऱ्यांना अब्जावधी रुपयांचा फटका बसला आहे.
आम आदमी पक्ष दिल्लीत स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करेल : फलोदी सट्टा बाजार
तीन फेब्रुवारी रोजी फलोदी सट्टा बाजारमधील बुकी आणि दलालांनी आप'ला ३७ ते ४१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्या सट्टा किंग नावाच्या बुकीने केजरीवाल निसटत्या मार्जिनने जिंकतील तर आतिशी प्रचंड मताने जिंकतील असे अंदाज वर्तवले होते. दरम्यान महाराष्ट्र सट्टा बाजारातील बुकी आणि दलालांनी 'आप'ला सरकार स्थापन करण्यात ५ जागांची उणीव भासू शकते तसेच भाजप सरकार स्थापन करू शकते से अंदाज वर्तवले होते. आता निकाल समोर आल्यानंतर, सट्टे बाजारात खळबळ उडाली आहे.
वृत्तानुसार, अरविंद केजरीवाल यांच्यासाठी बोली ३५ ते ४५ पैशांवर निश्चित करण्यात आली होती, परंतु निवडणुकीची तारीख जवळ येताच, पैजेची रक्कम १२० पैशांपर्यंत वाढवण्यात आली. आता अरविंद केजरीवाल जिंकू शकतील, पण फरक कमी असेल. याशिवाय, ते हरण्याची शक्यता देखील आहे, असे गृहीत धरून कोणतेही मोठे नुकसान टाळण्यासाठी, पैजेची रक्कम वाढवण्यात आली होती. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये अरविंद केजरीवाल पिछाडीवर होते, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत ते थोड्याशा आघाडीने पुढे असल्याचे दिसून आले. केजरीवाल यांनी पराभव मान्य केल्यानंतर मात्र बाजारत सन्नाटा पसरल्याची माहिती समोर आली आहे.
सट्टा किंगने सर्व ७० विधानसभा जागांवर सट्टा खेळला होता. एक्झिट पोल आणि राजकीय विश्लेषक कदाचित मागील काही निवडणुकांचा बोध घेत विधानसभानिहाय भाकित करण्यास कचरले असतील, परंतु सट्टा किंगने उघडपणे कोण कुठल्या जागा जिंकेल यांचे संडाज देखील वर्तवले होते. यातून सट्टा किंगची बक्कळ कमाई झाली. मात्र अतिआत्मविश्वास नडलाच.
दिल्ली निवडणुकीत सुमारे १५ जागांवर सट्टा किंगचा अंदाज चुकीचा ठरला आहे. बादली येथून भाजप उमेदवार दीपक चौधरी, मंगोलपुरी येथून राजकुमार चौहान, राजौरी गार्डन येथून मनजिंदर सिंग सिरसा, नवी दिल्ली येथून परवेश शर्मा, जंगपुरा येथून तरविंदर सिंग मारवाह, मालवीय नगर येथून सतीश उपाध्याय, आरके पुरम येथून अनिल कुमार शर्मा, मेहरौली येथून गजेंद्र सिंग यादव, कालकाजी येथून रमेश बिधुरी, सीमापुरी येथून रिंकू, शकूर बस्ती येथील कर्नल सिंह, वजीरपूर येथील पूनम शर्मा, हरी नगर येथील श्याम शर्मा आणि संगम विहार येथील चंदन चौधरी यांनी सट्टा किंगचा अंदाज खोडून काढला.
टीप : या बातमीचा उद्देश सट्टा बाजार किंवा कोणत्याही प्रकारच्या सट्टेबाजीला प्रोत्साहन देणे नाही. भारतात सट्टा लावणे बेकायदेशीर आहे. विधानसभानिहाय उमेदवारांचा पराभव किंवा विजय जाणून घेण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाची वेबसाइट तपासू शकता.