बांदोडा येथील ‘ओम कला सृष्टी’चे ‘मदनाची मंजिरी’ प्रथम

महिला संगीत नाट्य स्पर्धा : मडकईचे ‘भावनेचा तू भुकेला’ द्वितीय, मेरशीचे ‘सत्य-विजय’ला तृतीय


2 hours ago
बांदोडा येथील ‘ओम कला सृष्टी’चे ‘मदनाची मंजिरी’ प्रथम

बक्षीस प्राप्त झालेल्या नाटकातील कलाकार.

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

फोंडा : येथील राजीव गांधी कला मंदिर आयोजित (स्व. किशोरीताई हळदणकर स्मृतिप्रीत्यर्थ) दहाव्या अखिल गोवा महिला संगीत नाट्य स्पर्धेत बांदोडा येथील ओम कला सृष्टी संस्थेच्या महिलांनी सादर केलेल्या ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले, अशी माहिती राजीव गांधी कला मंदिरचे सदस्य सचिव स्वाती दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सुनील केरकर व श्रीकांत गावडे उपस्थित होते.                  

स्पर्धेत एकूण १५ नाटके सादर करण्यात आली. द्वितीय बक्षीस देवसाई कला क्रिएशन मडकई यांच्या  ‘भावनेचा तू भुकेला’,  तर तृतीय बक्षीस मेरशी येथील धरणी कला सृष्टी पथकाने सादर केलेल्या ‘सत्य-विजय’ या नाटकाला प्राप्त झाले. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक प्रतीक कला प्रोडक्शन मौळ भाटी यांच्या ‘कैकेयी’,  द्वितीय महादेव नाट्य मंडळ आगरवाडा  पाथकाच्या ‘विश्रब्ध शारदे’, तर महादेव भूमिका सेल्फ हेल्प ग्रूप महिला मंडळ साळ- डिचोली यांच्या ‘संत गोरा कुंभार’ या नाटकाला प्राप्त झाले. 

वैयक्तिक बक्षिसे प्राप्त केलेले कलाकार      

उत्कृष्ट दिग्दर्शक : प्रथम - गोविंद नाईक (विश्रब्ध शारदे),  द्वितीय - सुशांत नाईक (भावनेचा तू भुकेला),    उत्कृष्ट अभिनय (स्त्री भूमिकेसाठी) : प्रथम - लक्ष्मी महात्मे (कैकेयी), द्वितीय - मृगाली जगन्नाथ नाईक (ययाती आणि देवयानी),  उत्कृष्ट अभिनय (पुरुष भूमिकेसाठी) : प्रथम - दीपाश्री नाईक (सत्य-विजय), द्वितीय - संस्कृती नाईक (भावनेचा तू भुकेला), उत्कृष्ट नेपथ्य : प्रथम - अनिकेत नाईक व  विशाल गावडे (भावनेचा तू भुकेला), द्वितीय - संजय मुरारी म्हामल (विश्रब्ध शारदे). उत्कृष्ट प्रकाशयोजना : प्रथम - वैभव नाईक (विश्रब्ध शारदे), द्वितीय - खेमराज पिळगावकर (मदनाची मंजिरी).      

 उत्कृष्ट ध्वनीसंकलन : प्रथम - सनी जगन्नाथ नाईक (भावनेचा तू भुकेला), द्वितीय - वसुंधरा तानाजी गावडे (मदनाची मंजिरी). उत्कृष्ट वेशभूषा : प्रथम - चंदन प्रियोळकर (भावनेचा तू भुकेला), द्वितीय - शिल्पा नागेशकर (मदनाची मंजिरी).  उत्कृष्ट रंगभूषा : प्रथम - एकनाथ नाईक (मदनाची मंजिरी),  द्वितीय - जुझे गोम्स (भावनेचा तू भुकेला).  उत्कृष्ट संवादिनी व आर्गन वादक : प्रथम - प्रदीप शिलकर (मदनाची मंजिरी), द्वितीय -  शिवानंद दाभोळकर (विश्रब्ध शारदे). उत्कृष्ट तबलावादक : प्रथम - शैलेश गावकर (मदनाची मंजिरी),  द्वितीय - सुशांत बोर्डीकर (संत गोरा कुंभार).  उत्कृष्ट गायन (स्त्री भूमिका) : प्रथम - श्रेया  रामदास कडकडे (मदनाची मंजिरी),  द्वितीय - बिंदिया नाईक (सत्य - विजय).      

उत्कृष्ट गायन (पुरुष भूमिकेसाठी) : प्रथम - प्रणाली विठ्ठल प्रभू (मदनाची मंजिरी), द्वितीय - रेखा गावस (ययाती आणि देवयानी). उत्कृष्ट बालकलाकार : प्रथम - मगन गौतम सरदेसाई (सत्य-विजय), द्वितीय - रिया रामा नाईक  (महामृत्युंजय).  उत्कृष्ट नवीन संहिता : प्रथम - सर्वेश नाईक  आणि द्वितीय - उमेश आगरवाडेकर.