म्हापशात लसणीच्या दरात घट

इतर भाजीपाल्यांसह चिकन, मटण, अंड्याचे दर स्थिर


2 hours ago
म्हापशात लसणीच्या दरात घट

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

म्हापसा : येथील बाजारपेठत चालू आठवड्यात लसूणचा घाऊक दर ५० रुपयांनी उतरला. तर टॉमेटो, कांदे, बटाटे, गाजरसह इतर भाजीपाल्यांचा दर स्थिर आहे. 

भाजीपाल्याचा घाऊक बाजारभाव प्रति किलोप्रमाणे टोमॅटो २५ ते ३० रुपये, बटाटे २० ते ३५ रुपये, कांदे ४० ते ४५ रुपये, गाजर ६० रुपये, वांगी ३० रुपये, ढब्बू मिरची ७० रुपये, कोबी २५ रुपये, कॉली फ्लॉवर २५ रुपये, दुधी ३० रुपये, चिटकी ३० रुपये, कारले ४० रुपये, दोडका ४० रुपये, बीट ५० रुपये, वालपापडी ५० रुपये, वाल ५० रुपये, काकडी ४० रुपये,  मिरची ५० रुपये, मडगड मिरची ६० रुपये, आले ८० रुपये, लसूण ३०० रुपये, भेंडी ५० रुपये, पालक १० रुपये जुडी, तांबडीभाजी १० रुपये जुडी, कोथिंबीर १० रुपये जुडी, शेपू १० रुपये जुडी, कांदा पात १० रुपये जुडी, मेथी १० रुपये जुडी, लिंबू ४ रुपयांना नग, मका ४० रुपयांना तीन नग, नारळ २० ते ५० रुपये नग.

      

मासळी प्रतिकिलो दर इसवण ८०० रुपये, चणाक ५०० रुपये, पापलेट ८०० रुपये, काळी पापलेट ४०० रुपये, सुंगटा (कोळंबी) ४०० रुपये, कर्ली २५० रुपये, बांगडा १०० रुपये, टोकी २०० रुपये, लेपो २०० रुपये, खेकडे २५० रुपये, खुबे-तिसर्या २०० रुपये, वेरली १५० रुपये, माणक्या ४०० रुपये, दोडयारे २०० रुपये, मडसो ४०० रुपये, मुटूशो ४०० रुपये, कोकार २५० रुपये.      

चिकन १७० रुपये किलो, मटण ८०० रुपये किलो व अंडी ८५ रुपये डझन.