केपे : मिराबाग-कुडचडे येथील पुलावरुन एकाची नदीत उडी

किनारी पोलीस आणि अग्निशामक दलांनी राबवली शोधमोहीम

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th January, 01:16 pm
केपे : मिराबाग-कुडचडे येथील पुलावरुन एकाची नदीत उडी

पणजी : कुडचडे येथील मिराबाग पुलावरुन बॅनी कुतिन्हो (५४, पंटेमळ-कुडचडे) याने झुआरी नदीत उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्थानिकांनी पोलीस, किनारी पोलीस आणि अग्निशामक दलास माहिती दिली.

सध्या किनारी पोलीस अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी आपल्या पथकासह शोध मोहीम राबली असून याकामी अग्निशामक दलाचीही मदत घेण्यात येत आहे. घटनास्थळी केपेचे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर व केपेचे मामलेदार नाथन अफान्सो यांची उपस्थिती असून त्यांच्या सूचनेनुसार, नौदलाच्या पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले आहे.

बातमी अपडेट होत आहे

हेही वाचा