मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर भानावरे; हॉटमिक्स डांबरीकरणासही गती
पणजी : राज्यातील खराब रस्त्यांबाबत काही दिवसांपूर्वी ‘कारणे दाखवा’ नोटिसा जारी केलेल्या २७ कंत्राटदार आणि ३० अभियंत्यांनी सरकारच्या निर्देशानुसार खराब रस्त्यांची कामे सुरू केलेली आहेत. त्यामुळे कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. काही भागांतील कामे पूर्ण झालेली आहेत. तर, अंतर्गत वाहिन्यांच्या कामांमुळे काही कामे प्रलंबित असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी शुक्रवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील खराब रस्त्यांचा विषय ऐरणीवर आलेला होता. पावसाळ्याआधी बांधण्यात आलेले बहुतांशी भागांतील रस्ते पावसाने वाहून गेले. तर, काही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले. त्याचा मोठा फटका वाहन चालकांना बसू लागल्यानंतर त्यांच्याकडून सरकारविरोधात संताप पसरला होता. यासंदर्भातील तक्रारी वाढू लागल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘पीडब्ल्यूडी’च्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, रस्त्यांची कामे केलेल्या कंत्राटदार आणि अभियंत्यांना फैलावर घेतले होते.
रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू