एका नृत्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केरळच्या काँग्रेस आमदार उमा थॉमस स्टेडियमवर पोहोचल्या होत्या. व्हीआयपी पॅव्हेलियनमधील आपल्या सीटच्या दिशेने चालत असताना त्या बॅरिकेडला धडकल्या आणि सुमारे १५ फूट खाली पडल्या व जमिनीवर त्यांचे डोके आदळले.
कोची: केरळमधील त्रिक्काकारा येथील काँग्रेस आमदार उमा थॉमस रविवारी संध्याकाळी जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या गॅलरीतून पडून गंभीर जखमी झाल्या. स्टेडियमच्या 'व्हीआयपी गॅलरी'मधून सुमारे १५ फूट उंचीवरून पडल्यानंतर त्यांचचे डोके जमिनीवर आदळले. त्यांच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत आमदारांना स्वयंसेवक व इतरांनी स्टेडियमजवळील खासगी रुग्णालयात दाखल केले.
हॉस्पिटलने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, त्यांच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या बरगड्यांना फ्रॅक्चर आणि फुफ्फुसात अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, त्यांची प्रकृती अजूनही गंभीर असून त्यांना 'व्हेंटिलेटर सपोर्ट'वर ठेवण्यात आले आहे.
उमा थॉमस एका नृत्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या. याचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री साजी चेरियन यांच्या हस्ते होणार होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले उद्योग मंत्री पी राजीव याआणि सांगितल्यानुसार, आरोग्य विभागातील तज्ञांची टीम लवकरच हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह उपचार देईल. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, आरोग्य विभागाचे तज्ञ वैद्यकीय पथक उमा थॉमस यांच्या प्रकृतीचे मूल्यांकन करेल. विरोधी पक्षनेते व्हीडी साठेसन यांनीही रुग्णालयात पोहोचले आणि जखमी आमदारांना तातडीने योग्य वैद्यकीय सेवा मिळणे हे त्यांचे प्राधान्य असल्याचे सांगितले. उमा थॉमस या काँग्रेसचे दिवंगत नेते थॉमस यांच्या पुत्री आहेत. थॉमस या थ्रिक्काकारा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०२१ मध्ये पी.टी. थॉमस यांच्या निधनानंतर काँग्रेसने उमा यांना निवडणुकीत उतरवले.