फोंडा : केरये-खांडेपार येथे दुचाकीची समोरून जाणार्‍या दुचाकीला पाठीमागून धडक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th December, 03:33 pm
फोंडा : केरये-खांडेपार येथे दुचाकीची समोरून जाणार्‍या दुचाकीला पाठीमागून धडक

फोंडा :  केरये-खांडेपार येथे दुचाकीची समोरून जाणार्‍या दुचाकीला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात वनिता विठोबा डोईफोडे (केरये - खांडेपार) व इमरान खान ( तिस्क उसगाव) हे दोघे जण जखमी झाले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.


  प्राप्त माहितीनुसार जीए -०५-के -६२२१ क्रमांकांची स्कुटर घेऊन वनिता डोईफोडे ही महिला फोंडाहुन खांडेपार येथे जात होती. केरये येथे पोहचल्यावर मागाहून येणाऱ्या जीए -१२-बी -६८४६ क्रमांकाच्या स्कुटरची धडक बसल्याने वनिता रस्त्यावर कोसळून जखमी झाली. दुसऱ्या गाडीवर असलेला इम्रान देखील जखमी झाला. दोघांवर उपचार सुरू आहेत. फोंडा पोलीस स्थानकाचे हवालदार सज्योत सावंत यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.


हेही वाचा