किताबी लढतीत चीनच्या डिंग लिरेनवर केली मात
सिंगापूर : भारताच्या डोम्माराजू गुकेशने १४ व्या फेरीत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून २०२४ ची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सिंगापूरमध्ये खेळली गेलेली ही स्पर्धा जिंकून गुकेश जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे.
गुकेशने गॅरी कास्पारोव्हचा विक्रम मोडला आहे. त्यांनी १९८५ मध्ये २२ वर्षे ६ महिने वयात विश्वविजेतेपदाचा मान मिळवला होता. या जागतिक चॅम्पियनशिपची सुरुवात गुकेशसाठी चांगली नव्हती. तो पहिल्या फेरीत मागे पडला होता, परंतु त्याने तिसऱ्या फेरीत जबरदस्त पुनरागमन केले.
१८ वर्षीय भारतीय स्टारने ११व्या फेरीत आघाडी घेतली, परंतु डिंग लिरेन माघार घेण्यास तयार नव्हता व पुढील फेरीत त्यालाट लिरेनने नमवले. मात्र शेवटच्या फेरीत गुकेशने विजेतेपद पटकावले. डोम्माराजू गुकेशने यावर्षी कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकून वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली होती. विश्वविजेता बनल्यानंतर गुकेशला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही.
शेवटच्या फेरीत खेळ संपवला
डिंगने गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. अशा परिस्थितीत त्याने गतविजेता म्हणून या स्पर्धेत प्रवेश केला होता. तर गुकेशने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कँडिडेट्स टूर्नामेंटमधून चॅलेंजर म्हणून या चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश केला होता. विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला.
गुकेशच भावनांवरील नियंत्रण सुटले!
या अद्भुत कामगिरीबद्दल गुकेशचे खूप अभिनंदन. हे प्रतिभा, कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेचे परिणाम आहे. त्याच्या या विजयाने केवळ बुद्धिबळाच्या इतिहासात आपले नाव नोंदवले नाही तर लाखो तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली आहे. आगामी स्पर्धांसाठी मी त्याला शुभेच्छा देतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान