वेरोडा कुंकळ्ळीत घराला आग, फ्रीजसह अन्य उपकरणे जळून खाक

अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण, हजारोंचे नुकसान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12th December 2024, 12:38 pm
वेरोडा कुंकळ्ळीत घराला आग, फ्रीजसह अन्य उपकरणे जळून खाक

मडगाव : वेरोडा कुंकळ्ळी येथील बंद घराला गुरुवारी आग लागण्याची घटना घडली. किचनमधील फ्रीजला आग लागून ती इतरत्र पसरली. यात किचनमधील साहित्य जळाले असून लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली असून कुंकळ्ळी अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुंकळ्ळी अग्निशामक दलाला सकाळी साडेदहा वाजता वेरोडा कुंकळ्ळी येथील घराला आग लागल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशामक दलाला घर बंद असून किचनमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. वीज पुरवठा बंद करण्यात आल्यानंतर 'अग्निशामक'च्या कर्मचाऱ्यांनी घरात प्रवेश केल्यावर त्यांना किचनमधील फ्रीजला आग लागल्याचे दिसून आले. 

घरात धूर कोंडला गेल्याने कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन मास्कच्या सहाय्याने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. या घटनेत स्वयंपाकघरातील विजेच्या उपकरणांसह भांडी ठेवण्याचे कपाटही जळून गेले आहे. अग्निशामक दलाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे.

या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी कुंकळ्ळी स्टेशन फायर अधिकारी तृप्तेश नाईक, अभय लोलयेकर, प्रभाकर वेळीप, रोहन काणकोणकर व विनय वेळीप यांच्या पथकाने कार्य केले.

हेही वाचा