अखिल गोवा टेबल टेनिस स्पर्धेत विशेष मुलांच्या प्रतिभेची चमक

आस्थाच्या आनंद निकेतनतर्फे आयोजन : स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th December, 09:57 pm
अखिल गोवा टेबल टेनिस स्पर्धेत विशेष मुलांच्या प्रतिभेची चमक

पणजी : आस्थाच्या आनंद निकेतनने स्पेशल ऑलिम्पिक भारत गोवाच्या सहकार्याने विशेष मुलांसाठी द्वितीय अखिल गोवा टेबल टेनिस स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभला.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला आयएचसीएलचे मोनालिसा फर्नांडिस, संतोष हरमलकर व चेस परेरा यांच्यासह स्पेशल ऑलिम्पिक भारत गोवाचे सीईओ विक्टर वाझ, आस्थाचे सहसचिव राजेश खेडेकर, आस्थाचे सदस्य डॉ. अजित मोपकर यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावले. याशिवाय आयएचसीएलने खेळाडूंच्या चहापान व नाश्त्याचीही व्यवस्था केली होती.

स्पर्धेदरम्यान अतिथी म्हणून संदीप दिवकर, डॉ. सचिन पालयेकर आणि ब्रह्मानंद कामत यांच्यासह आस्थाचे स​चिव डॉ. चंद्रशेखकर केळकर यांची उपस्थिती लाभली. केळकर यांच्या हस्ते स्पर्धेतील पहिल्या विजेत्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्थाचे आनंद निकेतन सर्व सहभागी, पाहुणे, देणगीदार आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानते. त्यांच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनाने खरोखरच समुदायाची शक्ती आणि समावेशाची भावना दर्शविली, असे अस्थातर्फे सांगण्यात आले. एकूण १३ विशेष शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

विजेते पुरुष संघ

डिव्हिजन १ : प्रथम सोनल नाईक (एसएफएएल), द्वितीय : गौरीश शेटकर (आनंद निकेतन), तृतीय स्थान : विराज कुमार (सेंट झेवियर्स अकादमी). डिव्हिजन २ : प्रथम : अविनाश गावकर (केशव सेवा साधना, वाळपई), द्वितीय : चिराग वळवईकर (संजय सेंटर पर्वरी), तृतीय : राबानी मोहम्मद (एसएफएएल), डिव्हिजन ३ : प्रथम : ओंकार सावंत (केशव सेवा साधना, डिचोली), द्वितीय : राम नाथ भंडारी (पीस हेवन), तृतीय : मुसैफ शेख (न्यू डॉन आशादीप).

डिव्हिजन ४ : प्रथम बसवराज अर्सानल (न्यू डॉन अर्शदीप), द्वितीय : हरिश नाईक (केशव साधना, डिचोली), तृतीय : विशाल पै (लोकविश्वास प्रतिष्ठान, फोंडा). डिव्हिजन ५ : प्रथम प्रज्वल रायकर (चेतना एज्युकेशनल ट्रस्ट), द्वितीय : देवराज ठाणेकर (केशव सेवा साधना, वाळपई), तृतीय : ओंकार भिंगी (लोकविश्वास प्रतिष्ठान फोंडा). डिव्हिजन ६ : प्रथम गौरीश नाकाडे (गुजराती समाज स्पेशल स्कूल, मडगाव), द्वितीय : शुभम नाईक (पीस हेवन स्पेशल स्कूल), तृतीय : हर्ष नाईक (दिशा चॅरिटेबल ट्रस्ट, पणजी).

स्पर्धेतील विजेत्या महिला खेळाडू

डिव्हिजन १ : प्रथम : तयाम्मा मदार (अर्शदीप), द्वितीय : वनिता गावकर (केएसएस वाळपई), तृतीय : कृतिका नाईक (केएसएस डिचोली), डिव्हिजन २ : प्रथम : सोनिया पाटील (दिशा), द्वितीय : लक्ष्मी पावने (केएसएस, वाळपई), तृतीय : श्रुष्टी मोये. डिव्हिजन ३ : प्रथम संजना जाधव,​ द्वितीय : मंजू परब (सेंट झेवियर्स), तृतीय : निनोष्का फर्नांडिस (पीस हेवन). डिव्हिजन ४ : प्रथम कल्पिता वेरेकर (गुजराती समाज), द्वितीय : भूमी गावडे (संजय पर्वरी), तृतीय : आरती सतरकर (एलव्हीपी फोंडा),

स्पर्धेचा उत्साही समारोप

या स्पर्धेचा समारोप उत्साही समारोप सोहळ्याने झाला. प्रतिमा पेडणेकर, पूजन पेडणेकर आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर डॉ. रुचिका दावर यांनी पारितोषिकांचा अंतिम संच सादर केला आणि या अॅक्शनपॅक्ड दिवसाचा उत्साहपूर्ण आणि आनंददायी शेवट केला. कै. प्रभाकर पेडणेकर यांच्या स्मरणार्थ पेडणेकर परिवारातर्फे पारितोषिके देण्यात आली.