नायजर-कोगी : उत्तर नायजेरियातील नायजर नदीत शुक्रवारी झालेल्या बोट उलटल्याने २७ जणांचा मृत्यू झाला. तर १०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. त्यापैकी बहुतांश महिला आहेत. ही बोट कोगी राज्यातील बाजाराकडे जात असताना ती उलटली. बोटमध्ये सुमारे २०० लोक होते. आपत्कालीन सेवा एजन्सीच्या प्रवक्त्यांनी सांगितल्यानुसार, पाणबुड्यांच्या सहाय्याने बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र ओव्हरलोडमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक कयास आहे.
बातमी अपडेट होत आहे