थिवी येथे घरात मालवाहू ट्रक शिरल्याने नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th November, 12:27 am
थिवी येथे घरात मालवाहू ट्रक शिरल्याने नुकसान

म्हापसा : थिवी येथे चर्चजवळील चढतीवर अचानक मालवाहू ट्रक बंद पडला व स्टिअरिंग लॉक होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या नरेंद्र सावंत यांच्या घरात घुसला. या घटनेत सावंत यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

ही घटना गुरुवारी रात्री ११.०५ वाजण्याच्या सुमारास घडली. बिजापूरहून म्हापशाच्या दिशेने केए २८ डी ७९५९ क्रमांकाचा सिमेंटवाहू ट्रक येत होता. थिवी सेंट ख्रिस्तोफर चर्चजवळ ट्रक अचानक बंद पडला व स्टिअरिंग लॉक झाले. यामुळे ट्रक रिव्हर्समध्ये आला व रस्त्याच्या शेजारील घरात घुसला.

या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. कोलवाळ पोलीस हवालदार नरेंद्र नाईक यांनी पंचनामा केला. शुक्रवारी दुपारी हा ट्रक क्रेनच्या सहाय्याने हटविण्यात आला. 

हेही वाचा